रत्नागिरी : ओंकार पांडुरंग फडके यांची जिल्हा सरचिटणीसपदी नियुक्ती
रत्नागिरी, 5 मार्च, (हिं. स.) : भारतीय जनता पार्टी रत्नागिरी जिल्हा दक्षिणच्या सरचिटणीसपदी ओंकार पांडुरंग फडके यांची नियुक्ती करण्यात आली. जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांनी पदभार स्वीकारल्यानंतर प्रदेशाकडून मान्यता घेऊन आपली जिल्हा कार्यकारिणीची घोष
रत्नागिरी : ओंकार पांडुरंग फडके यांची जिल्हा सरचिटणीसपदी नियुक्ती


रत्नागिरी, 5 मार्च, (हिं. स.) : भारतीय जनता पार्टी रत्नागिरी जिल्हा दक्षिणच्या सरचिटणीसपदी ओंकार पांडुरंग फडके यांची नियुक्ती करण्यात आली.

जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांनी पदभार स्वीकारल्यानंतर प्रदेशाकडून मान्यता घेऊन आपली जिल्हा कार्यकारिणीची घोषणा केली. या कार्यकारिणीमध्ये महत्त्वाचे समजले जाणारे सरचिटणीसपद ओंकार फडके यांना देण्यात आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या GST 2.0 REFORM अभियानाचे जिल्हा संयोजकपद श्री. फडके यांनी यापूर्वी यशस्वीरीत्या सांभाळले आहे.

ओंकार फडके भारतीय जनता पार्टीचे अनेक वर्षे नाचणे परिसरात तसेच रत्नागिरीमध्ये भाजपाचे सक्रिय कार्यकर्ते आहेत. याआधी त्यांनी दोन वेळेस तालुका सरचिटणीस तसेच एक वेळा जिल्हा संयोजक आय टी सेलची जबाबदारी यशस्वीरीत्या सांभाळली होती.

जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव तसेच प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनातून आपण भाजपाचे काम नक्कीच योग्य प्रकारे करू, असे मनोगत व्यक्त केले. प्रशासनाचा प्रदीर्घ अनुभव असल्याने त्यांच्या या निवडीबद्दल सर्व भाजपा कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

रत्नागिरी शहराध्यक्ष दादा ढेकणे, मध्य मंडल तालुकाध्यक्ष प्रतीक देसाई, माजी युवा मोर्चा अध्यक्ष अनिकेत पटवर्धन यांनी श्री. फडके यांचे विशेष अभिनंदन केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande