छ. संभाजीनगर - ऑनलाईन कुक्कुटपालन प्रशिक्षणास ८६ जणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
छत्रपती संभाजीनगर, 05 मार्च, (हिं.स.)। धाराशिव जिल्ह्यात कुक्कुटपालन व्यवसायाला मोठी बाजारपेठ व भरपूर वाव उपलब्ध असून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी पशुसंवर्धन विभाग सातत्याने प्रयत्नशील आहे.या पार्श्वभूमीवर सघन कुक्कुट विकास गट,धाराशिव या
छ. संभाजीनगर - ऑनलाईन कुक्कुटपालन प्रशिक्षणास ८६ जणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद


छत्रपती संभाजीनगर, 05 मार्च, (हिं.स.)। धाराशिव जिल्ह्यात कुक्कुटपालन व्यवसायाला मोठी बाजारपेठ व भरपूर वाव उपलब्ध असून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी पशुसंवर्धन विभाग सातत्याने प्रयत्नशील आहे.या पार्श्वभूमीवर सघन कुक्कुट विकास गट,धाराशिव यांच्या वतीने ‘ऑनलाईन’ कुक्कुटपालन प्रशिक्षण यशस्वीरित्या संपन्न झाले.या प्रशिक्षणाद्वारे जिल्ह्यातील तरुण आणि पशुपालकांना व्यावसायिक कुक्कुटपालनाचे तंत्रशुद्ध ज्ञान देण्यात आले.

प्रशिक्षणाचा उद्घाटन कार्यक्रम डॉ. धनंजय महाजन,उपायुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय, धाराशिव तसेच डॉ.मनोज घाटे, उपायुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय,परभणी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

विविध क्षेत्रातील प्रशिक्षणार्थ्यांचा सहभाग

सध्याच्या बेरोजगारीच्या पार्श्वभूमीवर शेतीपूरक व्यवसायाकडे वाढता कल दिसून येत असून या प्रशिक्षणास मोठा प्रतिसाद मिळाला.सुशिक्षित बेरोजगार युवक-युवती,विविध शाखांचे महाविद्यालयीन विद्यार्थी, महिला बचत गटातील सदस्या तसेच प्रगतशील पशुपालक अशा एकूण ८६ प्रशिक्षणार्थ्यांनी नोंदणी करून प्रशिक्षणाचा लाभ घेतला.

तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन

प्रशिक्षणादरम्यान केवळ तात्विक माहिती न देता अनुभवी तज्ज्ञांनी व्यावहारिक अडचणींवरही सविस्तर मार्गदर्शन केले.त्यामध्ये डॉ.मंगेश वडे (सहयोगी प्राध्यापक,पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय,अकोला) यांनी गावरान/देशी कुक्कुटपालन कसे करावे याविषयी मार्गदर्शन केले.

डॉ.दीपक औताडे (मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्र,पुणे) यांनी अंडी उबवणूक केंद्राचे व्यवस्थापन व तांत्रिक बाबी स्पष्ट केल्या.डॉ.लोकेश नागदिवटे (बदक पैदास केंद्र, गडचिरोली) यांनी जिल्ह्यासाठी नवीन असलेल्या ‘बदक पैदास’ व्यवसायाबाबत माहिती दिली.

डॉ.अंगद बनकर (Kwality Animal Feeds Pvt. Ltd., बेलगावी) यांनी करार पद्धतीने केल्या जाणाऱ्या कुक्कुटपालनाचे फायदे सांगितले.डॉ.प्राजक्ता कुलकर्णी (कुक्कुट प्रकल्प,परभणी) यांनी लेयर व्यवस्थापनावर सविस्तर चर्चा केली.डॉ.स्वप्नील जिंतपुरे (पशुवैद्यकीय चिकित्सालय,उपळा) यांनी मांसाल कुक्कुटपालन, कोंबड्यांचे लसीकरण व जैव सुरक्षा (Biosecurity) याबाबत मार्गदर्शन केले.

प्रशिक्षणाच्या सांगता समारंभात डॉ. धनंजय महाजन यांच्या हस्ते प्रशिक्षणार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की,“केवळ प्रशिक्षण घेऊन थांबू नका,तर मिळालेल्या तंत्रज्ञानाचा वापर करून स्वतःचा यशस्वी उद्योग उभारा.विभागातर्फे सर्वतोपरी सहकार्य केले जाईल.”

कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन सघन कुक्कुट विकास गटाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.वैभव पाटील यांनी केले.त्यांनी कुक्कुट व्यवसायासाठी आवश्यक विविध परवाने,शासकीय योजना व बँक कर्जाबाबत मार्गदर्शन केले आणि उपस्थितांचे आभार मानले.या प्रशिक्षणामुळे जिल्ह्यात कुक्कुटपालन क्षेत्रात नवीन उद्योजक निर्माण होण्यास मोठी गती मिळणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande