अवैध देशी दारू वाहतूक करणारा आरोपी जेरबंद; अडीच रुपयांचा मुद्देमाल जप्त
लातूर, 05 मार्च (हिं.स.)। जिल्ह्यातील अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी विशेष पथकाची स्थापना केली असून सदर पथक थेट त्यांच्या नियंत्रणाखाली कार्यरत आहे. जिल्ह्यात अवैध दारू विक्री, वाहतूक, मटका, जुगार तसेच इतर बेकाय
पोलीस कारवाई


लातूर, 05 मार्च (हिं.स.)। जिल्ह्यातील अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी विशेष पथकाची स्थापना केली असून सदर पथक थेट त्यांच्या नियंत्रणाखाली कार्यरत आहे. जिल्ह्यात अवैध दारू विक्री, वाहतूक, मटका, जुगार तसेच इतर बेकायदेशीर व्यवसायांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी सर्व पोलीस यंत्रणेला दिलेल्या आहेत. त्या अनुषंगाने विशेष पथकने मोठ्या प्रमाणात अवैध देशी दारू जप्त करण्यात आले आहे.

दि. 05/03/2026 रोजी सकाळी पोलीस स्टेशन मुरुड हद्दीत सकाळी सुमारे 7 वाजण्याच्या सुमारास पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाला गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की, करकट्टा ते माटेफळ रोड मार्गे पांढऱ्या रंगाची इंडिका विस्ता कार (क्र. MH-24-V-1311) मधून मोठ्या प्रमाणात अवैध देशी दारू वाहतूक होत आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे सापळा रचण्यात आला. सकाळी सुमारे 07.45 वाजण्याच्या सुमारास करकट्टा –माटेफळ रोडवरील एका खडी केंद्रासमोर संशयित वाहन येताना दिसल्याने पथकाने सदर वाहनास थांबवून चालकाची चौकशी केली. चालकाने त्याचे नाव

दिगांबर मंचक जाधव (वय 42 वर्ष), रा. गोविंदनगर ता. रेणापूर जि. लातूर, ह.मु. शिवाजीनगर मुरुड असे सांगितले.

वाहनाची झडती घेतली असता वाहनामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध देशी दारूचा साठा आढळून आला. झडतीदरम्यान सिमला संत्रा,

टेंगो पंच, जीएम कडकधार संत्रा नावाच्या 180 एम.एल. देशी दारूच्या बाटल्या,वाहतुकीस वापरलेली इंडिका विस्टा कार (क्र. MH-24-V-1311) – अंदाजे किंमत ₹1,50,000/- असा एकूण ₹2,51,920/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सदर प्रकरणी आरोपी दिगांबर मंचक जाधव याच्याविरुद्ध पोलीस स्टेशन मुरुड येथे गुन्हा कलम 65 (अ) (ई) महाराष्ट्र दारूबंदी कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांच्या नियंत्रणाखाली कार्यरत विशेष पथकाने केली असून कारवाईत पोउपनि. अयूब शेख, श्रेणी पो.उपनि. उत्तम जाधव आदींनी केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande