समाज कल्याण क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी सात राज्यस्तरीय पुरस्कारांसाठी मागविले अर्ज
छत्रपती संभाजीनगर, 05 मार्च, (हिं.स.)। सामाजिक न्याय विभागामार्फत समाज कल्याण क्षेत्रामध्ये वैशिष्ट्यपूर्ण काम करणाऱ्या व्यक्ती व स्वयंसेवी संस्थांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने विविध राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानपूर्वक गौरविण्यात येते. यामध्
समाज कल्याण क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी सात राज्यस्तरीय पुरस्कारांसाठी मागविले अर्ज


छत्रपती संभाजीनगर, 05 मार्च, (हिं.स.)। सामाजिक न्याय विभागामार्फत समाज कल्याण क्षेत्रामध्ये वैशिष्ट्यपूर्ण काम करणाऱ्या व्यक्ती व स्वयंसेवी संस्थांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने विविध राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानपूर्वक गौरविण्यात येते. यामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार,साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे पुरस्कार,पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार,संत रविदास पुरस्कार,लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार,शाहु,फुले, आंबेडकर परितोषिक तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्राविण्य पुरस्कार या सात पुरस्कारांचा समावेश आहे.

सन २०२४-२५ व २०२५-२६ या वर्षांतील सात पुरस्कारांकरिता समाज कल्याण क्षेत्रात उल्लेखनीय व वैशिष्ट्यपूर्ण कार्य करणाऱ्या व्यक्ती व स्वयंसेवी संस्थांनी या पुरस्कारांसाठी अर्ज सादर करावेत, इच्छुकांनी विहीत नमुन्यातील अर्ज तीन प्रतीत (स्पायरल बायडिंग न करता) दिनांक १५ मार्च २०२६ पर्यंत या कार्यालयात सादर करावेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande