छ.संभाजीनगर : जनगणना प्रक्रिया समजावून घेण्यासाठी प्रशिक्षण महत्त्वाचे - जिल्हाधिकारी
छत्रपती संभाजीनगर, 05 मार्च (हिं.स.)। जनगणनेचे कार्य हे अत्यंत महत्त्वाचे कार्य असून त्यासाठीच्या प्रशिक्षणात सहभागी सर्व अधिकारी- कर्मचारी यांनी सर्व प्रक्रिया पूर्णपणे लक्ष देऊन समजावून घ्यावी,असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले. भार
छ.संभाजीनगर : जनगणना प्रक्रिया समजावून घेण्यासाठी प्रशिक्षण महत्त्वाचे - जिल्हाधिकारी


छत्रपती संभाजीनगर, 05 मार्च (हिं.स.)। जनगणनेचे कार्य हे अत्यंत महत्त्वाचे कार्य असून त्यासाठीच्या प्रशिक्षणात सहभागी सर्व अधिकारी- कर्मचारी यांनी सर्व प्रक्रिया पूर्णपणे लक्ष देऊन समजावून घ्यावी,असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले.

भारतीय जनगणना २०२७ च्या पहिला टप्पा एप्रिल २०२६ पासून सुरु होणार आहे. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा चार्ज अधिकारी व जनगणना कामकाज हाताळणारे अधिकारी- कर्मचारी यांचे तीन दिवसीय प्रशिक्षणास जिल्हाधिकारी कार्यालयात सुरुवात झाली. या प्रशिक्षणात १६८अधिकारी- कर्मचारी सहभागी झाले आहेत.

या प्रशिक्षणासाठी जनगणना संचालनालयातून उपनिबंधक वाय.एस. पाटील, जनगणना अन्वेषक पवन गोडे, राजवर्धन पाटील हे अधिकारी आले आहेत. निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, उपजिल्हाधिकारी एकनाथ बंगाळे यावेळी उपस्थित होते. या प्रशिक्षणात महसूल विभागाचे चार्ज अधिकारी तथा तहसिलदार, अतिरिक्त चार्ज अधिकारी तथा नायब तहसिलदार, जनगणना महसूल सहायक तथा सहायक महसूल अधिकारी, नगरपालिका नगरपंचायत विभागासाठी चार्ज अधिकारी तथा मुख्याधिकारी, अतिरिक्त चार्ज अधिकारी, जनगणना लिपिक किंवा अवल कारकून, नगररचना विभागाचे अधिकारी- कर्मचारी सहभागी झाले होते.

----

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande