
पुणे, 05 मार्च (हिं.स.)। भारत सरकारच्या सहसंचालक जनगणना कार्य निदेशालयाच्या आदेशानुसार जनगणनेच्या अनुषंगाने घरयाद्यांबाबत जिल्हास्तरीय प्रशिक्षण ६ मार्च २०२६ पर्यंत सकाळी ९.३० ते सायंकाळी ६ या वेळेत बहुउद्देशीय सभागृह, पाचवा मजला, जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथे आयोजित करण्यात आले आहे.
या प्रशिक्षणास जिल्ह्यातील अतिरिक्त जनगणना अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, जनगणना महसूल सहायक, लिपीक व तांत्रिक सहायक उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा जनगणना अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु