छ. संभाजीनगरमध्ये कृषीधारा जिल्हास्तरीय कृषी महोत्सवाचे आयोजन
छत्रपती संभाजीनगर, 05 मार्च (हिं.स.)। कृषी विभाग आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या वतीने छत्रपती संभाजीनगरमध्ये सहा व सात मार्च रोजी कृषीधारा जिल्हास्तरीय कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि शे
छ. संभाजीनगरमध्ये कृषीधारा जिल्हास्तरीय कृषी महोत्सवाचे आयोजन


छत्रपती संभाजीनगर, 05 मार्च (हिं.स.)। कृषी विभाग आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या वतीने छत्रपती संभाजीनगरमध्ये सहा व सात मार्च रोजी कृषीधारा जिल्हास्तरीय कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणावर भर दिला जाणार आहे.

पैठण रोडवरील कृषी तंत्र महाविद्यालय परिसरात ६ मार्चरोजी सकाळी १०.३० वाजता महोत्सवास प्रारंभ होईल. दोन दिवसीय महोत्सवात शेतकरी आणि नागरिकांसाठी विविध उपक्रमांची मेजवानी असणार आहे. आधुनिक कृषी अवजारांचे प्रदर्शन भरवण्यात येणार असून विविध विभागांचे माहिती देणारे स्टॉल येथे उपलब्ध असतील.

पौष्टिक तृणधान्यांच्या महत्त्वाबद्दल जनजागृती करण्यासाठी विशेष प्रदर्शनाबरोबरच धान्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. 'उत्पादक ते ग्राहक' या संकल्पनेनुसार शेतकऱ्यांना आपला माल थेट ग्राहकांना विकण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. महोत्सवाला उपस्थित राहावे, असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी आश्विनी पठारे यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande