लातूरात भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन
लातूर, 05 मार्च (हिं.स.)। भूमी अभिलेख विभागातील कर्मचाऱ्यांनी लातूर शहरात जुन्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात विविध प्रलंबित मागण्यांसाठी काम बंद आंदोलन सुरु केले आहे. लातूर जिल्ह्यातील कर्मचारी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. लातू
कामबंद आंदोलन


लातूर, 05 मार्च (हिं.स.)।

भूमी अभिलेख विभागातील कर्मचाऱ्यांनी लातूर शहरात जुन्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात विविध प्रलंबित मागण्यांसाठी काम बंद आंदोलन सुरु केले आहे. लातूर जिल्ह्यातील कर्मचारी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. लातूरच्या जुन्या जिल्हाधिकारी कार्यालय बाहेर कर्मचाऱ्यांचे ठिय्या मांडत आंदोलन सुरू आहे. आंदोलनामुळे नागरिकांची गैरसोय झाली असून जमिनीशी संबंधित नोंदी, मोजणी, नकाशे आणि इतर कामकाजावर परिणाम झाला आहे. प्रलंबित मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande