
लातूर, 05 मार्च (हिं.स.)। लातूर शहर महानगरपालिकेकडून थकबाकीदारांसाठी सुवर्णसंधी! जप्तीची कटू कारवाई टाळण्यासाठी आणि आपल्या कराचा बोजा कमी करण्यासाठी आजच या योजनेचा लाभ घ्या.
सवलत: व्याजात (शास्तीमध्ये) ७०% सूट
मुदत: ५ मार्च ते १३ मार्च २०२६
अट: थकीत कराचा भरणा एकरकमी करणे आवश्यक.
महापौर जयश्री सोनकांबळे व उपमहापौर ॲड. स्नेहल उटगे यांच्या सूचनेनुसार आणि आयुक्त श्रीमती मानसी यांच्या निर्णयानुसार ही योजना लागू करण्यात आली आहे.
ही संधी पुन्हा मिळणार नाही, आजच आपला कर भरा आणि शहराच्या विकासात हातभार लावा!
लातूर महानगरपालिका: आता कर भरणे झाले सोपे! ७०% दंड माफी!
फक्त ५ ते १३ मार्च दरम्यान मालमत्ता करावरील शास्तीमध्ये मिळवा ७०% भरघोस सूट.
जप्तीची कारवाई टाळा.
सुवर्णसंधीचा लाभ घ्या.
महानगरपालिकेला सहकार्य करा.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis