छ. शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान टप्पा-१ अंतर्गत जिल्ह्यात शिबिरांचे आयोजन
छत्रपती संभाजीनगर, 05 मार्च, (हिं.स.)। छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान टप्पा -१ अंतर्गत जिल्ह्यात ८४ मंडळस्तरावर दि.७ ते १४ मार्च व एप्रिल महिन्यात १० ते १७ एप्रिल या कालावधीत तर नगरपालिकास्तराव ८ ते १५ मे दरम्यान शिबिरांचे आयोज
छ. शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान टप्पा-१ अंतर्गत जिल्ह्यात शिबिरांचे आयोजन


छत्रपती संभाजीनगर, 05 मार्च, (हिं.स.)। छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान टप्पा -१ अंतर्गत जिल्ह्यात ८४ मंडळस्तरावर दि.७ ते १४ मार्च व एप्रिल महिन्यात १० ते १७ एप्रिल या कालावधीत तर नगरपालिकास्तराव ८ ते १५ मे दरम्यान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे,अशी माहिती जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजीत पत्रकार परिषदेस निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन स्वामी, उपजिल्हाधिकारी संगिता राठोड आदी उपस्थित होते.

महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख करण्यासाठी व ग्रामिण भागात नागरिक शेतकरी, विद्यार्थी , महिला यांच्या दैनंदिन प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी शासनाने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान टप्पा-१ राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअंतर्गत जिल्ह्यात हे अभियान राबविण्याची तयारी प्रशासनाने केली असून त्याचे नियोजन या प्रमाणे- मंडळस्तरावर पूर्वतयारी दि.५ मार्च पर्यंत, दि.७ ते १४ मार्च मंडळस्तरावर शिबिरांचे आयोजन, दि.१० ते १७ एप्रिल मंडळस्तरावर शिबिरांचे आयोजन, दि.८ ते १५ मे नगरपरिषद, नगरपंचायत स्तरावर शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील ९ तालुके, ८४ मंडळ, ५०० सजा व १३६९ गावांमध्ये हे अभियान राबविण्यात येणार असून सर्व मिळून ८४ शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे.

या शिबिरात प्रलंबित फेरफार, अभिलेख दुरुस्ती, ७/१२ नोंदी दुरुस्ती, महसूली कायद्यांची जनजागृत व अंमलबजावणी, पाणंद रस्ते, दाखले वाटप, तुकडे बंदी, सामाजिक अर्थसहाय्य योजनांचे लाभ मंजूरी अशा अनेक सेवा दिल्या जाणार आहेत, अशी माहितीही जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिली. या अभियानाचा नागरिकांनी लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande