पुणे - जप्त वाहनांचा ६ मार्च रोजी जाहिर ई-लिलाव
पुणे, 05 मार्च (हिं.स.)। प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वायुवेग पथकाद्वारे मोटार वाहन कायद्यातील विविध गुन्ह्यांमध्ये अटकावून ठेवलेली, मोटार वाहन कर न भरलेली तसेच हक्क सांगून सोडवून न घेतलेली एकूण ७ वाहने www.mstcindia.co.in या संकेतस्थळावर ऑनलाईन
पुणे - जप्त वाहनांचा ६ मार्च रोजी जाहिर ई-लिलाव


पुणे, 05 मार्च (हिं.स.)। प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वायुवेग पथकाद्वारे मोटार वाहन कायद्यातील विविध गुन्ह्यांमध्ये अटकावून ठेवलेली, मोटार वाहन कर न भरलेली तसेच हक्क सांगून सोडवून न घेतलेली एकूण ७ वाहने www.mstcindia.co.in या संकेतस्थळावर ऑनलाईन जाहिर ई-लिलावाद्वारे विक्रीस ठेवण्यात आली आहेत.

ही वाहने आळंदी रस्ता कार्यालयाच्या आवारात कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत पाहणीकरिता उपलब्ध आहेत.

सदर ई-लिलाव रद्द अथवा तहकूब ठेवण्याचे अधिकार उप प्रादेशिक परिवहन अधिकारी तथा कराधान प्राधिकारी, पुणे यांच्याकडे राखीव आहेत.या जप्त वाहनांचा जाहिर ई-लिलाव ६ मार्च रोजी करण्यात येणार आहे.

वाहन मालक, चालक, वित्तदाते किंवा ज्या कोणाचे हितसंबंध आहेत त्यांनी लिलावाच्या तारखेपूर्वी महसूल भरून किंवा हक्क सांगून वाहने सोडवून घेता येतील. लिलावानंतर कोणतीही हरकत ग्राह्य धरली जाणार नाही, असे आवाहन कराधान प्राधिकारी तथा उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande