छ. संभाजीनगर - परदेशातील नागरिकांसाठी सुरक्षा सूचना व हेल्पलाईन क्रमांक जाहीर
छत्रपती संभाजीनगर, 05 मार्च (हिं.स.)। मध्यपूर्व व परिसरातील काही देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण प्रादेशिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारत सरकार व महाराष्ट्र शासन यांनी जारी केलेल्या सूचनांनुसार संबंधित देशांतील भारतीय दूतावासांनी तेथे वास्त
छ. संभाजीनगर - परदेशातील नागरिकांसाठी सुरक्षा सूचना व हेल्पलाईन क्रमांक जाहीर


छत्रपती संभाजीनगर, 05 मार्च (हिं.स.)। मध्यपूर्व व परिसरातील काही देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण प्रादेशिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारत सरकार व महाराष्ट्र शासन यांनी जारी केलेल्या सूचनांनुसार संबंधित देशांतील भारतीय दूतावासांनी तेथे वास्तव्यास असलेल्या भारतीय नागरिकांसाठी सुरक्षा ॲडव्हायझरी जारी केली आहे.

या अनुषंगाने पॅलेस्टाईन (रामल्ला),कतार (दोहा),सौदी अरेबिया (रियाध),इस्रायल (तेल अवीव),इराण (तेहरान),इराक (बगदाद), कुवैत,बाहरीन,मस्कत,जॉर्डन आणि संयुक्त अरब अमिरात (अबू धाबी) येथे वास्तव्यास असलेल्या सर्व भारतीय नागरिकांनी सतर्क राहावे,अनावश्यक हालचाल टाळावी आणि स्थानिक प्रशासन तसेच भारतीय दूतावासांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे,असे आवाहन करण्यात आले आहे.

आपत्कालीन परिस्थितीत संबंधित देशांतील भारतीय दूतावासांच्या २४x७ हेल्पलाईन क्रमांकांवर संपर्क साधावा. दूतावास नियमितपणे परिस्थितीवर लक्ष ठेवून आवश्यक सूचना जारी करत आहेत. महाराष्ट्र शासनाच्या वतीने परदेशातील महाराष्ट्रातील नागरिकांनी शांतता व संयम राखावा,अधिकृत सूचनांचे पालन करावे आणि आवश्यक असल्यास तात्काळ भारतीय दूतावासाशी संपर्क साधावा,असे आवाहन करण्यात येत आहे.

महाराष्ट्र शासन नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत सतर्क असून केंद्र शासन व संबंधित दूतावासांशी समन्वय ठेवून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.

आपत्कालीन संपर्क तपशील

SEOC (२४X७)

राज्य आपत्कालीन परिस्थिती किंवा परदेशातील व्यक्तींच्या सुरक्षेबाबत माहिती देण्यासाठी नागरिकांनी खालील SEOC क्रमांकावर संपर्क साधावा:

टोल फ्री क्र.१०७७

फोन नं. +९१-९३२१५८७१४३

कार्यालयीन क्र.०२२-२२०२७९९०

ई-मेल आयडी: controlroom@gov.in

संबंधित देशांतील भारतीय दूतावासांचे संपर्क तपशील

रामल्लाह (पॅलेस्टाईन)

फोन: +९७०५९२९१६४१८

ईमेल: repoffice@mea.gov.in / cons.ramallah@mea.gov.in

दोहा (कतार)

फोन: ००९७४-५५६४७५०२

ईमेल: cons.doha@mea.gov.in

रियाध (सौदी अरेबिया)

फोन: ००-९६६-११-४८८४६९७

WhatsApp: ००-९६७-५४२१२६७४८

टोल फ्री: ८०० २४७ १२३४

ईमेल: cw.riyadh@mea.gov.in

तेल अवीव (इस्रायल)

फोन: +९७२-५४-७५२०७११ / +९७२-५४-२४२८३७८

ईमेल: conal.telaviv@mea.gov.in

तेहरान (इराण)

फोन: +९८९१२८१०९११५ / +९८९१२८१०९१०९ / +९८९१२८१०९१०२ / +९८९९३२१७९३५९

अबू धाबी (संयुक्त अरब अमिरात)

टोल फ्री: ८००-४६३४२

WhatsApp: +९७१५४३०९०५७१

ईमेल: pbsk.dubai@mea.gov.in / ca.abudhabi@mea.gov.in

कुवैत

फोन: ९६५६५५०१९४६

ईमेल: community.kuwait@mea.gov.in

बाहरीन

फोन: ००९७३-३९४१८०७१

मस्कत

टोल फ्री: ८००७१२३४

WhatsApp: +९६८९८२८२२७०

ईमेल: cw.muscat@mea.gov.in / cons.muscat@mea.gov.in

जॉर्डन

फोन: ००९६२-७७० ४२२ २७६

बगदाद (इराक)

फोन: +९६४ ७७१ ६५१ ११८५ / +९६४ ७७०४४४४८९९

वेबसाइट: coibaghdad.gov.in

ईमेल: cons.baghdad@mea.gov.in / cons1.baghdad@mea.gov.in / pol.baghdad@mea.gov.in असे आहेत.

परदेशात अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी राहावे आणि अनावश्यक हालचाल टाळावी.भारतीय दूतावास/कॉन्सुलेटच्या अधिकृत सूचनांचे पालन करावे.आपले लोकेशन व स्थिती कुटुंबियांना सतत कळवावी.मोबाईल चार्ज ठेवावा व आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवावीत.सोशल मीडियावर अफवा, अप्रमाणित संदेश किंवा चुकीची माहिती पसरवू नये.स्थानिक भारतीय दूतावासाकडे नोंदणी करणे अत्यावश्यक आहे.

जिल्ह्यातील नागरिकांसाठी सूचना

उपरोक्त देशांमध्ये आपले नातेवाईक किंवा जवळच्या व्यक्ती अडकून पडलेले असतील तर त्यांची माहिती धाराशिव प्रशासनास खालील क्रमांकांवर संपर्क साधून द्यावी.अडकलेल्या नातेवाईकांशी संपर्क झाला असल्यास त्यांना कोणत्या मदतीची आवश्यकता आहे याबाबत जिल्हा प्रशासनास कळवावे.ज्या नातेवाईकांशी संपर्क होऊ शकत नाही, त्यांची माहिती प्रशासनास सविस्तरपणे देण्यात यावी,असे आवाहन करण्यात येत आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष:

०२४७२- २२४३६६, ०२४७२-२२५६१८.

टोल फ्री क्रमांक :१०७७

धाराशिव पोलीस नियंत्रण कक्ष:

०२४७२-२२२९००,

०२४७२-२२२७००

निवासी उपजिल्हाधिकारी, धाराशिव: ७५८८९३८६८६

तहसीलदार तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी,धाराशिव: ९४२३३३९१९२

उपविभागीय अधिकारी,धाराशिव: ७०८३६६३१३९

उपविभागीय अधिकारी,उमरगा: ९८५०८९७०४२

उपविभागीय अधिकारी,कळंब: ९९२२४४७८१२

उपविभागीय अधिकारी,भूम: ९५६६०९६६९१

तहसीलदार धाराशिव: ९६५७५७६७१४

तहसीलदार तुळजापूर : ७७७६८८९९९९

तहसीलदार उमरगा : ९४२२४६९०१३

तहसीलदार लोहारा : ७८७५२४३८३४

तहसीलदार कळंब : ९८८१७४५५७७

तहसीलदार वाशी:

९०९६२५५७३७

तहसीलदार भूम:

९८२३७२२२७४

तहसीलदार परंडा:

८२०८५१३६५६

वरील क्रमांकांवर संपर्क साधावा,असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण,धाराशिव यांनी दिली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande