मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा क्षेत्रात “शाब्बास वहिनी” स्त्री शक्तीचा महासंग्राम
- पाककला व मेहंदी स्पर्धा, स्त्री सन्मान सोहळा, कॅन्सर तपासणी शिबीर - महिला बॉक्स क्रिकेट स्पर्धा, १४ मार्च रोजी ह्या कार्याक्रमाचा अंतिम सोहळा मुंबई, 05 मार्च (हिं.स.) - महिलांच्या कलागुणांना व कौशल्यांना व्यासपीठ मिळावे, समाजातील महिलांच्या सक्
मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा क्षेत्रात “शाब्बास वहिनी” स्त्री शक्तीचा महासंग्राम


- पाककला व मेहंदी स्पर्धा, स्त्री सन्मान सोहळा, कॅन्सर तपासणी शिबीर

- महिला बॉक्स क्रिकेट स्पर्धा, १४ मार्च रोजी ह्या कार्याक्रमाचा अंतिम सोहळा

मुंबई, 05 मार्च (हिं.स.) - महिलांच्या कलागुणांना व कौशल्यांना व्यासपीठ मिळावे, समाजातील महिलांच्या सक्षमीकरणाचा संदेश पोहचावा तसेच सध्याच्या धकाधकीच्या जीवनात महिलांना काही आनंदाचे विरंगुळ्याचे क्षण मिळावे या हेतूने मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा क्षेत्राचे खासदार रविंद्र वायकर यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत विविध स्पर्धांच्या माध्यमातून “शाब्बास वाहिनी-२०२६” स्त्री शक्तीचा महासंग्राम या भव्य दिव्या अशा कार्यक्रमातून जनतेला बघायला मिळणार आहे. १४ मार्च रोजी ह्या कार्याक्रमाचा अंतिम सोहळा पार पडणार आहे.

यानिमित्ताने लोकसभा क्षेत्रातील विविध विधानसभेत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यात पाककला, मेहंदी, महिला बॉक्स क्रिकेट स्पर्धा, मिसेस व मिस उत्तर पश्चिम लोकसभा तसेच मिस व मिसेस विधानसभा, भव्य हळदी कुंकू समारंभ आदी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने महिलांसाठी कॅन्सर तपासणी शिबीराचे हि आयोजन करण्यात आले आहे. मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्रा अंतर्गत येणाऱ्या विविध विधानसभा (गोरेगाव, वर्सोवा, अंधेरी (पूर्व) तसेच अंधेरी (पश्चिम) क्षेत्रांत राहणाऱ्या तसेच विविध क्षेत्रात आपल्या मेहनतीने स्वताची वेगळी ओळख तसेच स्थान निर्माण करून इतर महिलांना मार्गदर्शन ठरणाऱ्या महिलांचा :स्त्री सन्मान सोहळा”च्या माध्यमातून सन्मान करण्यात येणार आहे. तसेच “शाब्बास वाहिनी-२०२६” स्पर्धाही पार पडणार आहे.

या कार्यक्रमामुळे महिला दिनाचा उस्ताह अधिक वाढणार असून लोकसभा क्षेत्रा अंतर्गत येणाऱ्या विधानसभा क्षेत्रातील महिलांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. विविध स्पर्धानमधील विजेत्यांना आकर्षक बक्षीसे व सन्मानचिन्हे देऊन गौरवण्यात येणार आहे. त्यामुळे या स्पर्धेमध्ये परिसरातील महिला व तरुणींनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन या कार्यक्रमाच्या आयोजिका मनीषा वायकर तसेच दिप्ति वायकर पोतनीस यांनी केले आहे. समाजात महिलांच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी असे उपक्रम महत्वाचे असल्याचे मतहि त्यांनी व्यक्त केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande