बीड - पुरातत्त्व विभागाने श्री खंडोबा दीपमाळ या ऐतिहासिक पर्यटनस्थळी उभारला टी पॉइंट
बीड, 05 मार्च, (हिं.स.) - बीड शहरात पर्यटन करण्याजोगी अनेक ठिकाणे आहेत. यात पुरातन खंडोबा दीपमाळ मंदिराचाही समावेश आहे. मात्र, अशा ठिकाणांच्या आसपास पर्यटकांना कुठल्याही सुविधा नव्हत्या. मात्र, पुरातत्त्व विभागाने श्री खंडोबा दीपमाळ या ऐतिहासिक पर्
बीड - पुरातत्त्व विभागाने श्री खंडोबा दीपमाळ या ऐतिहासिक पर्यटनस्थळी उभारला टी पॉइंट


बीड, 05 मार्च, (हिं.स.) - बीड शहरात पर्यटन करण्याजोगी अनेक ठिकाणे आहेत. यात पुरातन खंडोबा दीपमाळ मंदिराचाही समावेश आहे. मात्र, अशा ठिकाणांच्या आसपास पर्यटकांना कुठल्याही सुविधा नव्हत्या. मात्र, पुरातत्त्व विभागाने श्री खंडोबा दीपमाळ या ऐतिहासिक पर्यटनस्थळी टी पॉइंट उभारला असून, लवकरच याची सुरवात होणार आहे. पर्यटकांना चहा, नाश्त्यासह कपडे बदलणे, फ्रेश होण्याचीही व्यवस्था या ठिकाणी असेल.

श्री खंडोबा दीपमाळ मंदिर हे जिल्ह्यातील एक महत्त्वाचे ऐतिहासिक वधार्मिक पर्यटनस्थळ असून, येथे भाविक व पर्यटक मोठ्या प्रमाणावर दर्शनासाठी येतात. अलीकडच्या काळात पर्यटकांची संख्या लक्षणीयरीत्या वाढत आहे. आता या दीपमाळींची दुरुस्ती करण्यात येत असून, परराज्यातील कलाकारांकडून झळाळी देण्याचे काम सुरू आहे. आता या ठिकाणी उभारलेले टी पॉइंटही लवकरच सुरू होणार असल्याने पर्यटकांना किमान सुविधा भेटणार आहेत.

दरम्यान, खंडोबा दीपमाळ मंदिर शहराच्या बाजूला असल्याने आजूबाजूला वर्दळ नाही. त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने या ठिकाणी व्यवस्थेची गरज आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande