छ.संभाजीनगर जिल्ह्यातील पंस सभापती, उपसभापती १० मार्च रोजी ठरणार
छत्रपती संभाजीनगर, 05 मार्च (हिं.स.)। जिल्ह्यातील सर्व ९ पंचायत समित्यांच्या सभापती आणि उपसभापती निवडीसाठी १० मार्च रोजी दुपारी २ वाजता संबंधित पंचायत समितीच्या सभागृहात विशेष सभा आयोजित करण्यात आली आहे. या निवडीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्येक ताल
छ.संभाजीनगर जिल्ह्यातील पंस सभापती, उपसभापती १० मार्च रोजी ठरणार


छत्रपती संभाजीनगर, 05 मार्च (हिं.स.)।

जिल्ह्यातील सर्व ९ पंचायत समित्यांच्या सभापती आणि उपसभापती निवडीसाठी १० मार्च रोजी दुपारी २ वाजता संबंधित पंचायत समितीच्या सभागृहात विशेष सभा आयोजित करण्यात आली आहे. या निवडीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्येक तालुक्यासाठी स्वतंत्र पीठासीन अधिकाऱ्यांची नियुक्ती केली असून, सभापती पदाचे आरक्षणही निश्चित करण्यात आलेले आहे.

सभापती आणि उपसभापती पदासाठीचे नामांकन पत्र सभेच्या वेळेपूर्वी दोन तास आधी स्वीकारले जातील. सभेसाठी एकूण सदस्यांच्या १/३ गणपूर्ती असणे आवश्यक आहे. प्रथम सभापती पदाची निवड करण्यात येईल आणि त्यानंतर लगेच उपसभापती पदासाठीची निवडणूक प्रक्रिया पार पडेल, असे प्रशासनाने सांगितले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande