
नांदेड, 05 मार्च (हिं.स.)
पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये कायदा, सुव्यवस्था व शांतता कायम ठेवण्याकरिता पोलीस पाटलांची भूमिका महत्वाची असते. त्यामुळे पोलीस पाटलांनी पोलीस ठाण्याशी समन्वय साधून सतर्क असावे, असे आवाहन पोलीस ठाण्याच्या वार्षिक तपासणी नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी केले. त्यांनी पोलीस ठाण्याच्या वार्षिक तपासणी दरम्यान पोलीस पाटील व तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष यांच्याशी संवाद साधला. याप्रसंगी ते बोलत होते. यानिमित्ताने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक धीरज चव्हाण यांच्या संकल्पनेतून शहर सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेन्याचे संगणकप्रणालीद्वारे उद्घाटनही त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा पोलीस
अधीक्षक अविनाश कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, पोलीस निरीक्षक धीरज चव्हाण यांच्यासह इतर पोलीस अधिकारी, कर्मचारी यांची उपस्थिती होती. या भेटीदरम्यान विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप नांदेड, वार्षिक तपासणी दरम्यान बरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्या अंतर्गत विविध गुन्हे, इतर कायदा व मुव्यवस्थेच्या
दृष्टीने पोलीस निरीक्षक धीरज चव्हाण यांच्यामार्फत माहिती जाणून घेतली आणि त्यावर उपाययोजना करण्याच्या सूचना अधिनस्त पोलीस अधिकारी, कर्मचारी यांना दिल्या. त्याचप्रमाणे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावपातळीवरील कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने इतर माहिती देखील पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी पोलीस पाटील आणि तंटामुक्त गाव समितीचे यावेळी प्रत्येक गावचे पोलीस पाटील बैठकीस हजर होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis