
छत्रपती संभाजीनगर, 05 मार्च, (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीपूर्वी राजकीय घडामोडींना वेग आला असून नागद गटातून विजयी झालेल्या काँग्रेसच्या एकमेव सदस्य तृप्ती दिलीपसिंह राजपूत यांनी मुंबई येथे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.
पक्षप्रवेशानंतर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री अतुल सावे यांचीही भेट घेतली. जिल्हा परिषदेत भाजपचे २३ सदस्य असून दोन जणांचा पाठिंबा आधीच होता. तृप्ती राजपूत यांच्या प्रवेशामुळे भाजपची संख्या आता २६ झाली आहे. दरम्यान, जिल्हा परिषद अध्यक्षांची निवड १८ मार्च रोजी विशेष सर्वसाधारण सभेत होणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis