उद्यमी पुरस्कार २०२६ मध्ये पुण्यात ३५० उद्योजकांचा गौरव
पुणे, 05 मार्च, (हिं.स.)। तळागाळातील उद्योजकता आणि उत्पन्न निर्मितीच्या एका महत्त्वपूर्ण समारंभात, उद्योजक मार्गदर्शक आणि आयात-निर्यात तज्ज्ञ डॉ. ओंकार हरी माळी यांच्या नेतृत्वाखालील आयोजित उदयमी पुरस्कार २०२६ सोहळ्यात पुण्यातील बाणेर येथील बंतारा
उद्यमी पुरस्कार २०२६ मध्ये पुण्यात ३५० उद्योजकांचा गौरव


पुणे, 05 मार्च, (हिं.स.)। तळागाळातील उद्योजकता आणि उत्पन्न निर्मितीच्या एका महत्त्वपूर्ण समारंभात, उद्योजक मार्गदर्शक आणि आयात-निर्यात तज्ज्ञ डॉ. ओंकार हरी माळी यांच्या नेतृत्वाखालील आयोजित उदयमी पुरस्कार २०२६ सोहळ्यात पुण्यातील बाणेर येथील बंतारा भवन येथे महाराष्ट्रातील ३५० उद्योजकांचा सन्मान केला. या भव्य पुरस्कार सोहळ्यात शाश्वत आणि उत्पन्ननिर्मिती करणारे व्यवसाय उभारणाऱ्या उद्योजकांचा सन्मान करण्यात आला. महाराष्ट्रातील प्रादेशिक उद्योजक भारताच्या व्यावसायिक क्षेत्रात वाढता प्रभाव निर्माण करत असल्याचे या सोहळ्याने अधोरेखित केले.

हॉल ऑफ फेम, उद्यामी लक्षपती, उद्यामी दशलक्षपती, उद्यामी करोडपती, उद्यामी वॉरियर आणि उद्यामी गेम चेंजर अशा विविध श्रेणींमध्ये पुरस्कार प्रदान करण्यात आले. डॉ. ओंकार हरी माळी आणि सौ. आकांक्षा ओंकार माळी यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.सोहळ्यातील प्रमुख आकर्षण म्हणजे ‘करोडपती फेलिसिटेशन सेरेमनी’, ज्यामध्ये मोठ्या उलाढालीचा टप्पा गाठलेल्या उद्योजकांचा विशेष सन्मान करण्यात आला. हा सन्मान नव्या पिढीतील मराठी संपत्ती निर्मात्यांच्या उदयाचे प्रतीक ठरला.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande