अर्थसंकल्प 2026-27 मधील प्रमुख घोषणा
- अजित पवारांचे भव्य स्मारक, त्यांच्या नावाने नागरी पुरस्कार- पाचही ज्योतिर्लिंगांसाठी वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांकडे समन्वय- नवे गुंतवणूक धोरण जाहीर करणार- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना मुंबई, 06 मार्च (हिं.स.) - माजी उपमुख्यमंत्
विधान भवन मुंबई


- अजित पवारांचे भव्य स्मारक, त्यांच्या नावाने नागरी पुरस्कार- पाचही ज्योतिर्लिंगांसाठी वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांकडे समन्वय- नवे गुंतवणूक धोरण जाहीर करणार- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना

मुंबई, 06 मार्च (हिं.स.) - माजी उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वित्त खात्याची जबाबदारी स्वतःकडे घेतली. त्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी राज्याचा अर्थसंकल्प शुक्रवारी विधीमंडळात सादर केला. आपल्या राजकीय कारकीर्दीत फडणवीस यांनी दुसऱ्यांदा हा अर्थसंकल्प सादर केला.

- हा अर्थसंकल्प 2047 च्या विकासाकडे जाणारा आहे. ⁠महात्मा फुले यांच्या जन्माला 200 वर्ष पूर्ण होत आहे. यासाठी एक समिती स्थापन करुन विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी निधी दिला जाईल. संत गाडगेबाबा तीर्थक्षेत्र सर्किट विकसित करण्यात येणार आहे. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शताब्दी वर्षानिमित्त रायगड येथे पायाभूत सुविधा केल्या जातील. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचं काम पूर्ण झालं आहे. ग्रामसमृद्धी अभियान राबवलं जाणार आहे.

- अजित दादा पवार यांनी 11 वेळा अर्थसंकल्प मांडला. त्यांच्या करडी स्वभावामुळे शिस्त राहिली. त्यांना श्रद्धांजली म्हणून अजित दादा पवार यांचे भव्य स्मारक उभारले जाईल. त्यांच्या नावाने नागरी पुरस्कार सुरु केला जाईल. हा अर्थसंकल्प मी त्यांना समर्पित करतो, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

- राज्यातील नाशिक येथे त्र्यंबकेश्वर, पुण्यातील खेडमधील भीमाशंकर, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेरुळजवळील घृष्णेश्वर, बीड जिल्ह्यातील परळी येथील वैजनाथ मंदिर आणि हिंगोलीतील औंढा नागनाथ ही पाच ज्योतिर्लिंग आहेत. या पाचही ज्योतिर्लिंगांसाठी वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांकडे समन्वय सोपवण्यात आले आहे.

- मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचा तिसरा टप्पा मंजूर करण्यात आला आहे. ग्रामसडक योजनेअंतर्गत ३० हजार गावे जोडली. २४५० किमी रस्त्यांची कामं पूर्ण झाली असून २३ हजार पूलांचं काम हाती घेतलं आहे. मुंबई-पुणे जलदगती ट्रेनसाठी तरतूद करण्यात आली आहे.

- गोपीनाथ मुंडे अपघात योजनेत शेतमजूरांचा हा सहभाग करणार असल्याची घोषणा देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. पाणंद रस्त्यांना मान्यता दिली आहे. 30 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना हवामान, बाजारभाव माहिती दिली जात आहे. चारही कृषि विद्यापीठात एआयची मदत घेतली जात आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होत आहे. अॅग्रीस्टॅक योजना राबविण्यात येत आहे. १ कोटी ३१ लाख फार्मर आयडी फेब्रुवारी पर्यंत झाले आहे. चार वर्षांत भांडवली गुंतवणूक वाढवून पायाभूत सुविधा निर्माण केल्या जातील. आगामी दोन वर्षांत महाराष्ट्र नैसर्गिक शेती अभियानाची सुरुवात होणार आहे.

- राज्याचे नवे गुंतवणूक धोरण जाहीर करण्यात आले आहे. प्रत्येक जिल्ह्यात सुक्ष्म व लघू केंद्र स्थापन केले जातील. सूक्ष्म, लघु आणि मध्य उद्योग केंद्र उभारणार आहोत. ५० लाख प्रत्यक्ष रोजगार निर्माण होणार आहे. प्रधानमंत्री सौर योजनेअंतर्गत रुफ टॉप सोलर बसवणार, बांबू विकास प्रकल्प वाढवणार, परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल आहे. मुंबई आणि पुण्यात 50 अब्ज डॉलरचे केंद्र तयार करण्याचे उद्दिष्ट आहे. गडचिरोली नवं स्टील हब म्हणून उदयास आले आहे.

- मुंबईत केंद्राच्या मदतीने इंडियन इन्स्टिट्यूट क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी सुरु, पुणे हे जीसीसीसाठी देशात सर्वाधिक पसंतीचे शहर आहे. जगात गेमिंग क्षेत्रात अव्वल होण्यासाठी महाराष्ट्रात 295 पेक्षा जास्त गेमिंग स्टुडिओ तयार करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

- सातारा जिल्ह्यातील वासोटा किल्ल्यावर पर्यटकांसाठी रोप वे प्रकल्प उभारणार आहोत. नागपूरच्या रामटेकमध्ये तिसरी चित्रसृष्टी उभारणार आहोत.

- मुंबईत अजून एक भुयारी मेट्रो करणार, अटल सेतू मुंबई विमानतळाला जोडणार, राज्यात 1 हजार 200 किमीचे मेट्रो मार्ग उभारणार आहोत. 6 हजार किमीचे द्रुतगती मार्ग विकसित करणार आहोत. 2029 पर्यंत 165 किमी मेट्रो मार्गिका तयार करणार आहोत. दक्षिण मुंबईला 2028 पर्यंत समृद्धी महामार्गासोबत जोडणार आहोत. वर्सोवा-भाईंदर किनारी मार्ग डिसेंबर 2028 पर्यंत पूर्ण करणार, पनवेल ते कर्जत मार्ग अंतिम टप्प्यात, लवकरच वाहतुकीसाठी खुला करणार.

- कर्जमाफी योजना राबवण्याचं आश्वासन दिलं होतं. 30 सप्टेंबर 2025 रोजी पीक कर्ज थकित असलेल्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर. तसेच, नियमित कर्जपरतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन लाभ देण्यात येईल.

- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अशीच सुरु राहणार आहे. या योजनेकरता आवश्यक ती भरीव तरतूद करण्यात आल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

- मुंबई येथील हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे राष्ट्रीय स्मारकाचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. आता जून २०२६ पर्यंत दुसरा टप्पा पूर्ण करण्यात येईल. तर बाळासाहेब ठाकरे यांच्या दादरमधील स्मारकाचे पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. अंतिम काम जूनपर्यंत होईल. तर योजना पण लवकरच सुरू होईल.

काय स्वस्त झालं?

मधुमेहावरील उपचार

कर्करोगवरील औषधं

क्रीडा साहित्य

वैद्यकीय उपकरणे

सौर पॅनल

काय महाग झालं?

दारु

सिगारेट

तंबाखूजन्य पदार्थ

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande