
घरगुती आणि कमर्शिअल दोन्हींच्या दरात वृद्धी
नवी दिल्ली, 07 मार्च (हिं.स.) : देशभरात घरगुती आणि व्यावसायिक दोन्ही गॅस सिलेंडरच्या दरात आज, शनिवारपासून (7 मार्च 2026) दरवाढ करण्यात आली आहे. घरगुती वापराचा 14.2 किलोच्या सिलेंडरचे दर 60 रुपयांनी वधारले असून व्यावसायिक वापराच्या सिलेंडरच्या किंमतीत 115 रुपयांची वृद्धी करण्यात आली आहे.
यासोबतच व्यवसायांमध्ये वापरल्या जाणाऱ्या 19 किलो वजनाच्या व्यावसायिक सिलेंडरच्या किंमतीतही मोठी वाढ झाली आहे. दिल्लीमध्ये गॅस सिलेंडरची किंमत 1768.50 रुपयांवरून 1883 रुपये झाली आहे. तर मुंबईमध्ये 1720.50 रुपयांवरून 1835 रुपये झाली आहे. तसेच कोलकात्यात सिलेंडरचे दर 1875.50 रुपयांवरून 1990 रुपये झाले असून चेन्नईमध्ये 1929 रुपयांवरून 2043.50 रुपये झाली आहे.यापूर्वी एप्रिल 2025 पासून घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नव्हता. त्यामुळे या ताज्या दरवाढीचा घरगुती ग्राहक तसेच व्यावसायिक वापरकर्त्यांवर मोठा आर्थिक परिणाम होण्याची शक्यता आहे.
------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी