राज्याच्या अर्थसंकल्पात मुंबईकरांसाठी काय?
मुंबई, 06 मार्च (हिं.स.) - राज्याच्या अर्थसंकल्पात मुंबईचे महत्व अधिक आहे. यंदा मुंबई महापालिकेवर भाजपाच्या थेट सत्ता आल्याने मुंबईसाठी अधिकाधिक देण्याचा राज्य सरकारचा मानस आहे. त्यामुळेच आज, शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्य
मुंबई एमएमआर विकास


मुंबई, 06 मार्च (हिं.स.) - राज्याच्या अर्थसंकल्पात मुंबईचे महत्व अधिक आहे. यंदा मुंबई महापालिकेवर भाजपाच्या थेट सत्ता आल्याने मुंबईसाठी अधिकाधिक देण्याचा राज्य सरकारचा मानस आहे. त्यामुळेच आज, शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या वर्ष २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात मुंबईच्या विकासासाठी वेगवेगळ्या घोषणा केल्या आहेत.

* मुंबईत वडाळा ते गेट वे ऑफ इंडिया अजून एक भुयारी मेट्रो

* दक्षिण मुंबईला २०२८ पर्यंत समृद्धी महामार्गासोबत जोडणार

* २०२९ पर्यंत १६५ किमी मेट्रो मार्गिका तयार करणार

* अटल सेतू मुंबई विमानतळाला जोडणार

* राज्यात १ हजार २०० किमीचे मेट्रो मार्ग उभारणार

* ६ हजार किमीचे द्रुतगती मार्ग विकसित करणार

* वर्सोवा-भाईंदर किनारी मार्ग डिसेंबर २०२८ पर्यंत पूर्ण करणार

* पनवेल ते कर्जत मार्ग अंतिम टप्प्यात, लवकरच वाहतुकीसाठी खुला करणार

बुलेट ट्रेन, तिसरी मुंबई आणि चौथी मुंबई

* राज्यात शहरी विकास ७० टक्के लोकसंख्या होणार आहे. त्यामुळे शहरी सेवा डिजीटल करणार.

* मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन तीन स्थानकांचं २०२७ पर्यंत पूर्ण हेईल

* ⁠तिसरी मुंबई म्हणून उरण या परिसरात विकास होतील, चौथी मुंबई वाढवण येथे होईल* तिसरी मुंबईत रायगड, पेण व नवी मुंबई विमानतळ ही ग्रीन फिल्ड म्हणून विकसित करणार

* ⁠मुंबईत बेकायदेशीर बांधकाम होऊ नये यासाठी प्रयत्न

* एमएमआरमध्ये १० लाख नवी घरे उभारणार

* नवी अनधिकृत बांधकामे होणार नाहीच याचा रोडमॅप तयार होणार

मुंबई-पुणे जलदगती ट्रेनसाठी तरतूद केली आहे, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानतो. विकसित महाराष्ट्रात आपला वाटा सर्वात मोठा असेल, असे फडणवीस यांनी आश्वासन दिले. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गातील काम २०२७ पर्यंत पाच स्थानकांचे काम पूर्ण होईल. तिसरी मुंबईत रायगड पेण व नवी मुंबई विमानतळ ही ग्रीन फिल्ड म्हणून विकसित करणार असल्याचे जाहीर करण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande