क्रिस्टियानो रोनाल्डोच्या दुखापतीमुळे पोर्तुगालच्या गोटात चिंतेचे वातावरण
नवी दिल्ली, 07 मार्च, (हिं.स.) क्रिस्टियानो रोनाल्डोच्या दुखापतीमुळ पोर्तुगालच्या अडचणीत वाढ होणार आहे. अल-नासरचे प्रशिक्षक जॉर्ज जिझस म्हणाले की, क्रिस्टियानो रोनाल्डोची हॅमस्ट्रिंगची दुखापत सुरुवातीला वाटल्यापेक्षा जास्त गंभीर आहे. या दुखापतीमुळे
क्रिस्टियानो रोनाल्डो


नवी दिल्ली, 07 मार्च, (हिं.स.) क्रिस्टियानो रोनाल्डोच्या दुखापतीमुळ पोर्तुगालच्या अडचणीत वाढ होणार आहे. अल-नासरचे प्रशिक्षक जॉर्ज जिझस म्हणाले की, क्रिस्टियानो रोनाल्डोची हॅमस्ट्रिंगची दुखापत सुरुवातीला वाटल्यापेक्षा जास्त गंभीर आहे. या दुखापतीमुळे ४१ वर्षीय फुटबॉलपटूचा पोर्तुगालच्या आगामी मैत्रीपूर्ण सामन्यांमध्ये सहभाग संशयास्पद आहे.

गेल्या आठवड्याच्या शेवटी अल-नासरने अल-फायहाविरुद्ध ३-१ अशा सौदी प्रो लीग विजय मिळवला तेव्हा हा स्टार फुटबॉलपटू रोनाल्डो मैदानाबाहेर पडला होता. जिझसने यांनी सांगितले की, क्रिस्टियानोला गेल्या सामन्यात हॅमस्ट्रिंगच्या ताणामुळे मैदान सोडावे लागले होते. आता, तपासात असे दिसून आले आहे की त्याची दुखापत आमच्या अपेक्षेपेक्षा जास्त गंभीर आहे.

ते पुढे म्हणाले, त्याला विश्रांती आणि योग्य उपचारांची आवश्यकता आहे. क्रिस्टियानो उपचारांसाठी स्पेनला जाईल. त्याच्या वैयक्तिक फिजिओथेरपिस्टकडून त्याला उपचार मिळतील. आम्हाला आशा आहे की तो लवकरच संघात परतेल.

पोर्तुगाल त्यांच्या विश्वचषक तयारीचा भाग म्हणून २८ मार्च रोजी मेक्सिको सिटीमध्ये मेक्सिकोविरुद्ध आणि त्यानंतर १ एप्रिल रोजी अटलांटामध्ये अमेरिकेविरुद्ध मैत्रीपूर्ण सामने खेळेल. या हंगामात अल नासरसाठी त्याने २२ लीग सामन्यांमध्ये २१ गोल केले आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande