जिल्हा क्रिकेट असोसिएशन तर्फे नाशिक महिला प्रीमियर लीग ची घोषणा
नाशिकमध्ये महिला क्रिकेटसाठी नवे व्यासपीठ नाशिक, 07 मार्च (हिं.स.)। - जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे महिलादिनी नाशिक जिल्ह्यातील सर्व महिला क्रिकेटपटुंसाठी आनंदाची बातमी.नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन- एन डी सी ए - तर्फे नाशिक महिला प्रीमियर लीग (NW
District Cricket Association


नाशिकमध्ये महिला क्रिकेटसाठी नवे व्यासपीठ

नाशिक, 07 मार्च (हिं.स.)। - जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे महिलादिनी नाशिक जिल्ह्यातील सर्व महिला क्रिकेटपटुंसाठी आनंदाची बातमी.नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन- एन डी सी ए - तर्फे नाशिक महिला प्रीमियर लीग (NWPL) ची औपचारिक घोषणा आज करण्यात आली.

नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा यांनी यासाठीच्या हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान पॅव्हेलियन मध्ये आयोजित खास पत्रकार परिषदेत हि घोषणा केली. मंचावर याप्रसंगी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वरिष्ठ व २३ वर्षांखालील तसेच जिल्हा क्रिकेट असोसिएशन महिला संघाच्या निवड समितिच्या शर्मिला साळी, सुनिल मालुसरे, एन डी सी ए चे पदाधिकारी निखिल टिपरी व विक्रांत मते स्थानापन्न होते. परिषदेत विनोद शहा यांनी पत्रकारांच्या सर्व प्रश्नांची सविस्तर व मनमोकळेपणे उत्तरे दिली. यावेळी दैनिक व डिजिटल मेडियाचे खास प्रतिनिधी , कॅमेरामन यांसह पूनम महाजन, एन डी सी ए च्या महिला संघ प्रशिक्षक भावना गवळी, डॉ. भाविक मंकोडी, एन डी सी ए चे पदाधिकारी , सी इ ओ रतन कुयटे आदी उपस्थित होते.

नाशिकमधील महिला क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांना व्यावसायिक स्तरावर खेळण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी Nashik Women Premier League (NWPL) आयोजित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. नाशिकमधील महिला क्रिकेटच्या विकासासाठी हा एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.सध्या नाशिक जिल्ह्यात सुमारे १५० महिला क्रिकेटपटू सक्रियपणे क्रिकेट खेळत आहेत. या खेळाडूंना स्पर्धात्मक अनुभव, व्यावसायिक वातावरण आणि मोठ्या स्तरावर खेळण्याची संधी मिळावी या उद्देशाने नाशिक महिला प्रीमियर लीग आयोजित करण्यात येत आहे. ही स्पर्धा एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आयोजित करण्यात येणार असून स्पर्धेत ५ फ्रँचायझी संघ सहभागी होतील. स्पर्धा लीग पद्धतीने खेळवण्यात येणार असून त्यानंतर उपांत्य फेरी व अंतिम सामना होईल. संपूर्ण स्पर्धेत एकूण १३ सामने खेळवले जातील.

या खेळाडूंमध्ये ईश्वरी सावकार, तेजस्विनी बाटवाल, शाल्मली क्षत्रिय, रसिका शिंदे, ऐश्वर्या वाघ, प्रियंका घोडके, लक्ष्मी यादव, प्रचिती भवर, कार्तिकी गायकवाड आणि मधुरा दायमा या खेळाडूंनी विविध वयोगटात Board of Control for Cricket in India आयोजित स्पर्धांमध्ये Maharashtra Cricket Association च्या महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. स्पर्धेतील खेळाडूंची निवड ऑक्शन पद्धतीने करण्यात येणार असून प्रत्येक संघासाठी अधिकृत जर्सी असणार आहे. तसेच स्पर्धेपूर्वी ट्रॉफी अनावरण सोहळा, खेळाडू लिलाव कार्यक्रम, भव्य उद्घाटन समारंभ आणि समारोप समारंभ आयोजित करण्यात येणार आहेत.

या स्पर्धेच्या माध्यमातून जिल्हा स्तरावर महिला क्रिकेटचा विकास करणे, खेळाडूंना संरचित व्यासपीठ उपलब्ध करून देणे, महाराष्ट्र संघासाठी खेळाडू तयार करणे तसेच महिला क्रिकेटला समाजात अधिक प्रोत्साहन देणे हे उद्दिष्ट आहे. नाशिक महिला प्रीमियर लीगमुळे जिल्ह्यातील महिला क्रिकेटपटूंना जिल्हा – राज्य – राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचण्याचा मार्ग उपलब्ध होणार असून नाशिक शहराची क्रीडा क्षेत्रातील ओळख अधिक मजबूत होणार आहे. नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनने गेल्या आठ वर्षांपासून नाशिक प्रीमियर लीग (पुरुष) यशस्वीपणे आयोजित केली आहे. या स्पर्धेमुळे अनेक प्रतिभावान खेळाडूंना मोठे व्यासपीठ मिळाले आहे. नाशिकचे दोन खेळाडू Ramakrishna Ghosh आणि Sahil Parakh यावर्षीच्या Indian Premier League मध्ये सहभागी होत आहेत. त्याच धर्तीवर महिला क्रिकेटमध्येही अशीच संधी निर्माण करण्याचा असोसिएशनचा प्रयत्न आहे. नाशिकमधील क्रीडाप्रेमी, उद्योग क्षेत्र तसेच सर्व संबंधितांनी या उपक्रमाला सहकार्य करावे, असे आवाहन नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande