टी-20 विश्वचषक : वेस्ट इंडिज, द. आफ्रिका आणि इंग्लंडचे क्रिकेटपटू चार्टर विमानांनी मायदेशी परतणार
नवी दिल्ली, 07 मार्च (हिं.स.) - आयसीसी टी२० विश्वचषक २०२६ चा अंतिम सामना ८ मार्च रोजी खेळवला जाणार आहे. अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील सुरू असलेल्या युद्धामुळे, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि इंग्लंड सारखे संघ विश्वचषकातून बाहेर पडल्यानंतर अद्याप म
वेस्ट इंडिज क्रिकेट संघ


नवी दिल्ली, 07 मार्च (हिं.स.) - आयसीसी टी२० विश्वचषक २०२६ चा अंतिम सामना ८ मार्च रोजी खेळवला जाणार आहे. अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील सुरू असलेल्या युद्धामुळे, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि इंग्लंड सारखे संघ विश्वचषकातून बाहेर पडल्यानंतर अद्याप मायदेशी परतू शकलेले नाहीत. पण आता हे सर्व संघ चार्टर फ्लाइटने रवाना होणार आहेत. ज्यामध्ये दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिजचे क्रिकेटपटू एकत्र रवाना होणार आहेत.

वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेचे क्रिेकटपटू रविवारी एकत्र रवाना होतील. दक्षिण आफ्रिकेचे आणि वेस्ट इंडिजचे क्रिकेटपटू प्रथम जोहान्सबर्गला जातील आणि तेथून वेस्ट इंडिजचे क्रिकेटपटू अँटिग्वाला जाण्यासाठी विमानाने जातील. इंग्लंडचे क्रिकेटपटू थेट चार्टर फ्लाइटने लंडनला रवाना होतील. या सर्व संघांच्या परतीसाठी आयसीसीने सर्व व्यवस्था केली आहे.

दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिजबद्दल सांगायचे तर, त्यांचे क्रिकेटपटू टी२० विश्वचषकातून बाहेर पडल्यापासून कोलकात्यातच राहिले आहेत. वेस्ट इंडिजचा संघ १ मार्च रोजी कोलकातामध्ये टीम इंडियाकडून पराभूत झाला होता. उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेचा न्यूझीलंडकडून पराभव झाला. शिवाय, ५ मार्च रोजी झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात इंग्लंडचा भारताकडून पराभव झाला. आता, हे तिन्ही संघ रविवारी मायदेशी परतण्याची शक्यता आहे. या संघांच्या प्रस्थानानंतर, अंतिम सामना खेळल्यानंतर केवळ न्यूझीलंडचा संघ मायदेशी परतेल.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande