सलग दुसऱ्यांदा टी-20 विश्वचषक जिंकत टीम इंडिया इतिहास रचणार ?
अहमदाबाद, 07 मार्च (हिं.स.) टी-२० विश्वचषकाचा अंतिम सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात, कोणत्याही संघाने सलग दोनदा विजेतेपद जिंकलेले नाही, किंवा ते कायम राखले आहे. यावेळी
सूर्यकुमार यादव आणि मिचेल सँटनर


अहमदाबाद, 07 मार्च (हिं.स.) टी-२० विश्वचषकाचा अंतिम सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात, कोणत्याही संघाने सलग दोनदा विजेतेपद जिंकलेले नाही, किंवा ते कायम राखले आहे. यावेळी भारताकडे इतिहास रचण्याची सुवर्णसंधी आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने २०२४ मध्ये टी-२० विश्वचषक जिंकला आणि बऱ्याच काळानंतर विजेतेपद मिळवले होते. आता, जर टीम इंडियाने २०२६ चा अंतिम सामना जिंकला, तर टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात सलग दोन ट्रॉफी जिंकणारा तो पहिला संघ बनणार आहे.

या अंतिम सामन्यात टीम इंडिया इशान किशन अंतिम सामन्यात संजू सॅमसनसोबत डावाची सुरुवात करताना दिसू शकतो. अभिषेक शर्माला स्पर्धेत सातत्याने संधी मिळाल्या आहेत. पण तो अपेक्षेनुसार खेळण्यात अपयशी ठरला आहे. दरम्यान, संजू सॅमसन आणि इशान किशन यांनी मिळालेल्या संधींचा फायदा घेतला आहे. परिणामी, कर्णधार आणि प्रशिक्षक अंतिम सामन्यात सॅमसन-किशन जोडीला पुढे नेण्याची दाट शक्यता आहे. मधल्या फळीची धुरा प्रामुख्याने कर्णधार सूर्या, तिलक वर्मा आणि रिंकू सिंग यांच्या खांद्यावर असणार आहे. कर्णधार सूर्याची कामगिरी लौकीकाला साजेशी झालेली नाही. पण अंतिम सामन्यात त्याच्याकडून संघाला मोठ्या कामगिरीची अपेक्षा असणार आहेत. सुरुवातीच्या सामन्यांमध्ये अपयश आल्यानंतर तिलक वर्माने आपली लय मिळवली आहे.

भारतीय संघ अंतिम फेरीत तीन अष्टपैलू क्रिकेटपटूंना मैदानात उतरवण्याची शक्यता आहे. हे अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पंड्या, शिवम दुबे आणि अक्षर पटेल आहेत. हे तिघेही फलंदाजी आणि चेंडू दोन्हीने सामन्याचा मार्ग बदलण्यात पटाईत आहेत. ते सध्याच्या स्पर्धेत चांगल्या लयीत आहेत.जलद गोलंदाजीची जबाबदारी प्रामुख्याने जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग यांच्या खांद्यावर असेल. दोन्ही गोलंदाजांनी या स्पर्धेतही जोरदार गोलंदाजी केली आहे. वरुण चक्रवर्तीला मुख्य फिरकी गोलंदाज म्हणून संधी मिळू शकते. पण उपांत्य सामन्यात तो फारसा प्रभाव पाडू शकला नव्हता. त्यामुळे त्याच्याऐवजी कुलदिप यादवला संधी देण्याचा विचार संघ व्यवस्थापन करत असल्याची चर्चा आहे.

भारतीय संघ टी-२० विश्वचषकात न्यूझीलंडला पराभूत करु शकलेला नाही. किवी संघाने तिन्ही टी-२० विश्वचषक जिंकले आहेत. २००७ मध्ये झालेल्या पहिल्या टी-20 विश्चषकामध्ये न्यूझीलंडने भारताचा सुपर ८ सामन्या १० धावांनी पराभव केला होता. आणि २०१६ मध्ये नागपूरमध्ये भारताचा ७९ धावांवर बाद झाल्यानंतर ४७ धावांनी पराभव केला होता. तर २०21 च्या टी-20 विश्वचषकात न्यूझीलंडने भारताला आठ विकेट्सने मात दिली होती.

अहमदाबादमधील अंतिम सामन्यापूर्वी, भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-२० क्रिकेटमध्ये हेड-टू-हेड विक्रमात भारताचा वरचष्मा आहे. दोघांमध्ये एकूण ३० सामने खेळले गेले आहेत, ज्यात भारताने १८ जिंकले आणि न्यूझीलंडने १1 जिंकले आहेत. तर एक सामना बरोबरीत सुटला होता.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande