झी चित्रगौरवच्या २०२६ च्या मंचावर होणार मराठीचा सन्मान
मुंबई, 07 मार्च, (हिं.स.)। मराठी चित्रपटसृष्टीचा मानाचा आणि दिमाखदार सोहळा म्हणजेच ''झी चित्रगौरव पुरस्कार २०२६''. “मराठी गाजलंच पाहिजे म्हणत मराठमोळ्या अंदाजात यंदा प्रेक्षकांसमोर येत आहे. संपूर्ण सोहळ्यात मराठी संस्कृतीचा अभिमान, परंपरेचा ठसा
झी चित्रगौरवच्या २०२६ च्या मंचावर गाजणार मराठी, घुमणार मराठीचा हुंकार, होणार मराठीचा सन्मान


मुंबई, 07 मार्च, (हिं.स.)। मराठी चित्रपटसृष्टीचा मानाचा आणि दिमाखदार सोहळा म्हणजेच 'झी चित्रगौरव पुरस्कार २०२६'. “मराठी गाजलंच पाहिजे म्हणत मराठमोळ्या अंदाजात यंदा प्रेक्षकांसमोर येत आहे. संपूर्ण सोहळ्यात मराठी संस्कृतीचा अभिमान, परंपरेचा ठसा आणि आधुनिकतेची झलक अनुभवायला मिळणार आहे. झी चित्रगौरवच्या मंचावर मराठी गाजणार, घुमणार मराठीचा हुंकार आणि होणार मराठीचा सन्मान. यंदाचा सोहळा दिमाखदार रेड कार्पेटने सजणार असून मराठी चित्रपटसृष्टीतील नामांकित कलाकार मराठमोळ्या वेशभूषेत अवतरतील.

रेड कार्पेटवर उपस्थित मान्यवर कलाकारांचा एकच संदेश ठळकपणे उमटला तो म्हणजे – “मराठी गाजलंच पाहिजे !” मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी या कार्यक्रमाला हाजरी लावली- जेष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, सिद्धार्थ जाधव, वैदेही परशुरामी, अंकुश चौधरी , गौतमी देशपांडे, समीर चौघुले , रोहन मापुस्कर , शिवराज वायचळ, साजिरी जोशी, ऋजुता देशमुख, पर्ण पेठे, पुष्कराज चिरपुटकर, रेणुका शहाणे, अभिनय बेर्डे, प्रिया बेर्डे, अमृता सुभाष, भारत जाधव, अमृता खानविलकर, ऋता दुर्गुळे, ललित प्रभाकर यांनी आपले अनोख्या आऊटफिटचे प्रदर्शन रेड कार्पेटवर केले.

विशेष म्हणजे, काही कलाकारांनी पारंपरिकतेला आधुनिकतेची जोड देत वेगळा ट्रेंडही सादर केला. पारंपरिक दागिन्यांना मिनिमलिस्टिक स्टाईलची जोड देत त्यांनी ‘क्लासिक विथ अ ट्विस्ट’ असा फॅशन स्टेटमेंट केला. या मराठमोळ्या अवतारात कलाकारांनी केवळ फॅशनच नाही, तर आपल्या मातीशी असलेलं नातं आणि संस्कृतीविषयीचा आदर अभिमानाने मांडला.

'झी चित्र गौरव २०२६' रेड कार्पेटवरची ही झलक तुम्हाला १४ मार्चला संध्या ७:०० वा झी मराठी वर पाहायला मिळणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande