लातूरमध्ये क्षयरुग्णांसाठी ५० पोषण आहार किटचे वाटप
लातूर, 01 एप्रिल (हिं.स.)। आज दिनांक १ एप्रिल २०२६ रोजी डॉ. प्रदीप ढेले (सिव्हिल सर्जन, लातूर) व डॉ. आनंद कलमे (वैद्यकीय अधिकारी, सिव्हिल सर्जन कार्यालय, लातूर) यांच्या हस्ते जिल्हा प्रशिक्षण केंद्र, लातूर येथे क्षयरुग्णांना ५० फूड बास्केट (पोषण आ
क्षय रुग्ण


लातूर, 01 एप्रिल (हिं.स.)। आज दिनांक १ एप्रिल २०२६ रोजी डॉ. प्रदीप ढेले (सिव्हिल सर्जन, लातूर) व डॉ. आनंद कलमे (वैद्यकीय अधिकारी, सिव्हिल सर्जन कार्यालय, लातूर) यांच्या हस्ते जिल्हा प्रशिक्षण केंद्र, लातूर येथे क्षयरुग्णांना ५० फूड बास्केट (पोषण आहार किट) वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. प्रदीप ढेले हे होते.

कार्यक्रमास डॉ. बाळासाहेब जाधव (वैद्यकीय अधिकारी, प्रशिक्षण केंद्र लातूर), डॉ. होळे (तालुका आरोग्य अधिकारी, चाकूर), डॉ. हर्षवर्धन राऊत (वैद्यकीय अधिकारी, जिल्हा क्षयरोग केंद्र लातूर), डॉ. अविनाश देशमुख (वैद्यकीय अधिकारी, ए.आर.टी. सेंटर लातूर) तसेच जिल्हा क्षयरोग केंद्र लातूर येथील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande