
परभणी, 01 एप्रिल (हिं.स.) : पूर्णा तालुक्यातील आहेरवाडी येथे यात्रेदरम्यान पोलिस व होमगार्ड पथकासमोर एका व्यक्तीने हुज्जत घालत धक्काबुक्की केली. या प्रकरणी संबंधिताविरुद्ध सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस उपनिरीक्षक अमर हबीब चाउस हे पथकासह यात्रेच्या बंदोबस्तासाठी तैनात होते. मंदिर परिसरातील कुस्ती दंगलीदरम्यान दुपारी सुमारे 3.45 वाजता गर्दी वाढल्याने पोलिस व होमगार्ड नागरिकांना बाजूला करण्याचे प्रयत्न करत होते.तत्पूर्वी, तुकाराम नामदेव मोरे (रा. आहेरवाडी) यांना मागे सरकण्यास सांगितले असता त्यांनी आदेश पाळण्यास नकार दिला आणि वाद घालून होमगार्ड इंगोले यांना तसेच हस्तक्षेप करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांनाही धक्काबुक्की केली. पोलीस पाटील व स्थानिकांनी मध्यस्थी करून परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रसंगामुळे यात्रेत काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.या प्रकरणी तुकाराम मोरे यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास फौजदार प्रकाश इंगोले करीत आहेत.
-------------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis