जळगाव : पगारासाठी कामगारांचा मॅनेजरवर हल्ला; सात जणांविरुद्ध गुन्हा
जळगाव, 02 एप्रिल (हिं.स.) : एमआयडीसीतील तुलसी पाईप कंपनीत कामावरून कमी केलेल्या कामगारांनी दोन महिन्यांचा अतिरिक्त पगार मागत जनरल मॅनेजर आणि प्रोडक्शन मॅनेजरवर हिंसाचार केला. ही घटना 31 मार्च रोजी घडली. याप्रकरणी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात
जळगाव : पगारासाठी कामगारांचा मॅनेजरवर हल्ला; सात जणांविरुद्ध गुन्हा


जळगाव, 02 एप्रिल (हिं.स.) : एमआयडीसीतील तुलसी पाईप कंपनीत कामावरून कमी केलेल्या कामगारांनी दोन महिन्यांचा अतिरिक्त पगार मागत जनरल मॅनेजर आणि प्रोडक्शन मॅनेजरवर हिंसाचार केला. ही घटना 31 मार्च रोजी घडली. याप्रकरणी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उत्तरप्रदेशातील मुज्जफरनगर येथील रजत जसवीर शर्मा (वय ३१) हे प्रोडक्शन मॅनेजर तर कुंवर सुभाष प्रतापसिंग हे जनरल मॅनेजर म्हणून कंपनीत काम करतात. कंपनीतून कमी केलेले आनंद भागवत पवार, राहूल भागवत पवार, सागर मुरलीधर नफते यांनी कामावरून कमी झाल्याचा निषेध व्यक्त करत मॅनेजरवर हुज्जत घातली. या दरम्यान कुंवर प्रतापसिंग प्लांट राऊंडवर असताना प्रकरण अधिक गंभीर झाले.

रजत शर्मा हे भांडण सोडविण्यास गेले असता आनंद पवारने पडलेला लोखंडी पाईप फेकून त्यांना डोक्यावर मारले, ज्यामुळे गंभीर दुखापत झाली. जखमी झालेल्या शर्मा यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर ते पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी जात असताना संशयितांनी नेरीनाका येथे अडवून पुन्हा लाठ्या व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

मारहाणीनंतर आरोपींनी शर्मा यांना तू जळगावमध्ये ज्या ठिकाणी भेटशील, त्या ठिकाणी तुला मारू अशी धमकी दिली. एमआयडीसी पोलिसांनी रजत शर्मा यांची तक्रार नोंदवून आनंद भागवत पवार, राहूल भागवत पवार, सागर मुरलीधर नफते आणि चार अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

-------------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande