बालाघाटावरील मंदिरात श्रीदत्त मूर्ती प्राणप्रतिष्ठा, कलशारोहण २ ते ४ एप्रिलदरम्यान त्रिदिनी कीर्तन महोत्सव
बीड, 01 एप्रिल (हिं.स.)। बीड-मांजरसुंबा रोडवरील बालाघाट परिसरात संत परंपरेचा वारसा जपणारा दत्त मूर्ती प्राणप्रतिष्ठा, भव्य कलशारोहण सोहळा आणि त्रिदिनी कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा २ ते ४ एप्रिल या कालावधीत मोठ्या उत्साहात संपन्
बालाघाटावरील मंदिरात श्रीदत्त मूर्ती प्राणप्रतिष्ठा, कलशारोहण २ ते ४ एप्रिलदरम्यान त्रिदिनी कीर्तन महोत्सव


बीड, 01 एप्रिल (हिं.स.)। बीड-मांजरसुंबा रोडवरील बालाघाट परिसरात संत परंपरेचा वारसा जपणारा दत्त मूर्ती प्राणप्रतिष्ठा, भव्य कलशारोहण सोहळा आणि त्रिदिनी कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा २ ते ४ एप्रिल या कालावधीत मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे.

वै. गुरु बंकट स्वामी महाराज (नेकनूर) यांच्या कृपेने आणि श्री मन्मथ स्वामी (कपिलधार) व वाघेश्वरी माता यांच्या आशीर्वादाने हा सोहळा होत आहे. तपोरत्न शिवानंद शिवाचार्य महाराज (तमलुरकर), ह.भ.प. लक्ष्मण महाराज मेंगडे (निनगुर) यांचे विशेष मार्गदर्शन या महोत्सवाला लाभत आहे. दत्त उपासक वैजीनाथ महाराज शिंदे यांनी भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

या सोहळ्याला ह.भ.प. महादेव महाराज (चाकरवाडी), विश्वनाथ अप्पा सलगर, हरिहारनंद भारती महाराज (कोळवाडी), श्रीहरी पवार महाराज (कोल्हारवाडी), माउली महाराज काकडे (जरूड) आणि अंगद महाराज सातपुते यांच्यासह अनेक कीर्तनकार उपस्थित राहणार आहेत.

महोत्सवात दररोज पहाटे काकडा, सकाळी महायज्ञ, दुपारी महाप्रसाद आणि रात्री कीर्तन सेवा होणार आहे. २ एप्रिल रोजी विश्वनाथ महाराज स्वामी, ३ एप्रिल रोजी बालकीर्तनकार सोहम महाराज सातपुते तर ४ एप्रिल रोजी लक्ष्मण महाराज मेंगडे यांचे काल्याचे कीर्तन होईल. त्यानंतर गोरक्ष अश्रुबा रसाळ पाटील यांच्या वतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात येईल.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande