“स्वच्छतेतून आरोग्याचा संदेश” : पंचायत समिती पाथरीत स्वच्छता अभियान उत्साहात
परभणी, 1 एप्रिल (हिं.स.) - स्वच्छता ही काळाची गरज ओळखून पंचायत समिती पाथरी येथे बुधवार, दि. १ एप्रिल रोजी विशेष स्वच्छता अभियान उत्साहपूर्ण वातावरणात राबविण्यात आले. गटविकास अधिकारी ऋषिकेश सावंत यांच्या संकल्पना व मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या उप
“स्वच्छतेतून आरोग्याचा संदेश” : पंचायत समिती पाथरीत स्वच्छता अभियान उत्साहात


परभणी, 1 एप्रिल (हिं.स.) - स्वच्छता ही काळाची गरज ओळखून पंचायत समिती पाथरी येथे बुधवार, दि. १ एप्रिल रोजी विशेष स्वच्छता अभियान उत्साहपूर्ण वातावरणात राबविण्यात आले. गटविकास अधिकारी ऋषिकेश सावंत यांच्या संकल्पना व मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या उपक्रमात अधिकारी व कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. या अभियानाअंतर्गत पंचायत समितीच्या मुख्य इमारतीसह विविध विभागांचा परिसर स्वच्छ करण्यात आला. परिसरातील गवत काढणे, कचरा संकलन करणे तसेच परिसर सुशोभित करण्याची कामे करण्यात आली. “स्वच्छ कार्यालय, सुंदर कार्यालय” हा संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वांनी श्रमदान करत स्वच्छतेचा आदर्श निर्माण केला. या मोहिमेची विशेष बाब म्हणजे गटविकास अधिकारी ऋषिकेश सावंत यांनी स्वतः झाडू हाती घेत स्वच्छतेची सुरुवात केली. त्यांच्या कृतीमुळे कर्मचाऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आणि अभियान अधिक प्रेरणादायी ठरले. यावेळी संपूर्ण परिसर प्लास्टिकमुक्त करण्याची शपथ घेण्यात आली. स्वच्छ आणि आरोग्यदायी वातावरण राखणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचा संदेश यामधून देण्यात आला.यावेळी बोलताना गटविकास अधिकारी सावंत म्हणाले, “शासकीय कार्यालय ही सार्वजनिक मालमत्ता असून ती स्वच्छ ठेवणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे. स्वच्छ वातावरणामुळे कामाचा उत्साह वाढतो आणि नागरिकांनाही सकारात्मक अनुभव मिळतो.”या स्वच्छता अभियानात सहायक गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, कनिष्ठ प्रशासन अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी तसेच विविध विभागांतील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या उपक्रमात पशुधन अधिकारी डॉ. भागेश बसेट, बालविकास प्रकल्प अधिकारी मंगल गायकवाड, विस्तार अधिकारी (कृषी) संदीपान घुंबरे, कु. अश्विनी लोंढे, अनूराधा जोशी, संध्या वडकुते, नंदकुमार सूर्यवंशी, सुमीत वाघमारे, अनंत चाकोते, जाधव, बोरकर आदी उपस्थित होते. स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत राबविण्यात आलेल्या या अभियानातून पंचायत समिती पाथरीने स्वच्छतेचा आदर्श घालून दिला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande