इराणी तेलाची ६ लाख बॅरल तेल घेऊन जहाज भारताकडे रवाना
नवी दिल्ली , 01 एप्रिल (हिं.स.)।२०१९ नंतर भारताला इराणकडून कच्च्या तेलाची पहिली खेप मिळणार आहे. जहाज ट्रॅकिंग डेटानुसार, इराणच्या खार्ग बेटावरून सहा लाख बॅरल कच्चे तेल घेऊन अफ्रामॅक्स पिंग शुन हे जहाज गुजरातमधील वडिनार बंदराकडे येत आहे. हे जहाज ४ ए
२०१९ नंतर पहिल्यांदाच इराणी तेलाची ६ लाख बॅरल तेल घेऊन जहाज भारताकडे रवाना


नवी दिल्ली , 01 एप्रिल (हिं.स.)।२०१९ नंतर भारताला इराणकडून कच्च्या तेलाची पहिली खेप मिळणार आहे. जहाज ट्रॅकिंग डेटानुसार, इराणच्या खार्ग बेटावरून सहा लाख बॅरल कच्चे तेल घेऊन अफ्रामॅक्स पिंग शुन हे जहाज गुजरातमधील वडिनार बंदराकडे येत आहे. हे जहाज ४ एप्रिलपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.

अमेरिकेने २०१९ मध्ये इराणी तेलावर निर्बंध लादले होते. मात्र पश्चिम आशियातील संघर्षामुळे वाढलेल्या तेलाच्या किंमती नियंत्रणात ठेवण्यासाठी अमेरिकेने हे निर्बंध ३० दिवसांसाठी शिथिल केले असून ते १९ एप्रिलला संपणार आहेत. दरम्यान, अनेक भारतीय रिफायनऱ्यांनी इराणसोबत तेल खरेदीचे करार केल्याची माहिती आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, सध्या समुद्रातील जहाजांवर एकूण ९.५ कोटी बॅरल इराणी तेल साठवलेले असून त्यापैकी ५.१ कोटी बॅरल तेल भारताला विकले जाऊ शकते.

भारताकडे असलेला द्रवरूप इंधनाचा राखीव साठा केवळ २० ते ४० दिवसांच्या गरजा भागवू शकतो. दिल्ली येथे आयोजित पीएचडीसीसीआय हायड्रोकार्बन शिखर परिषदेत पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू नियामक मंडळाचे सचिव अंजन कुमार मिश्रा यांनी सांगितले की, “आपल्याकडे काही प्रमाणात द्रवरूप इंधनाचा साठा आहे, मात्र सहा महिने पुरेल असा साठा तयार करणे शक्य नाही.” त्यांनी पुढे सांगितले की, जागतिक तणाव असूनही देशात जीवाश्म इंधनाची कोणतीही कमतरता नाही. काही प्रमाणात चिंता असली तरी द्रवरूप इंधनाची टंचाई नाही.

मिश्रा यांनी सांगितले की, या संकटाच्या काळात भारताने बांगलादेश आणि श्रीलंका या दोन्ही देशांना मदत म्हणून तेल पुरवठा केला आहे. आयातीवरील अवलंबित्व कमी करण्याबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, देशांतर्गत कच्च्या तेलाचे उत्पादन वाढवणे ही टप्प्याटप्प्याने होणारी प्रक्रिया आहे आणि अलीकडील शोध तसेच सरकारी प्रयत्न असूनही ते तात्काळ साध्य होऊ शकत नाही. कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये होणाऱ्या संभाव्य वाढीबाबत त्यांनी स्पष्ट केले की, किंमतींमध्ये होणारी कोणतीही वाढ तात्पुरतीच असेल.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande