देशात लोकसंख्या नियंत्रण कायदा करावा - डॉ प्रविण तोगडिया
लातूर, 11 एप्रिल (हिं.स.)। समग्र हिंदू समृद्ध आणि सुरक्षेसाठी देशात हिंदू बहुमत कायम ठेवण्यासाठी देशात लोकसंख्या नियंत्रण कायदा करावा, असे मत आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे अध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया यांनी लातूर येथील भालचंद्र ब्लड बँकेच्या सभागृहात
डॉ प्रविण तोगडिया


लातूर, 11 एप्रिल (हिं.स.)।

समग्र हिंदू समृद्ध आणि सुरक्षेसाठी देशात हिंदू बहुमत कायम ठेवण्यासाठी देशात लोकसंख्या नियंत्रण कायदा करावा, असे मत आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे अध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया यांनी लातूर येथील भालचंद्र ब्लड बँकेच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने आयोजित कार्यकर्ता मेळाव्यासाठी डॉ. प्रवीण तोगडिया हे लातूर येथे आले होते. तेव्हा त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पुढे बोलताना डॉ. तोगडिया म्हणाले, देशात हिंदूंसाठी काही मुद्यावर आम्ही जनजागृती करत आहोत. त्यामध्ये पहिल्यांदा मी हिंदू आहे. हिंदू एकता विचार आणि व्यवहार, लोकसंख्या नियंत्रण कायदा, बंगलादेशीना पिटाळून लावणे, तीन बच्चे सबसे अच्छे आणि साप्ताहिक हनुमान चालीसा, असे कार्यक्रम राबविले जाणार आहेत. या पत्रकार परिषदेला आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे राज्य अध्यक्ष जगन्नाथराव यादव, बजरंग दलाचे विभाग अध्यक्ष आकाश मसाने व इतर पदाधिका-यांनी उपस्थिती होती.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande