महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली
नवी दिल्ली, 11 एप्रिल (हिं.स.)। महात्मा ज्योतिराव फुले यांच्या २०० व्या जयंतीनिमित्त राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान आणि लोकसभा अध्यक्षांनी प्रेरणा स्थळ येथे पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. लोकसभा सचिवालयाने दिलेल्या माहितीनुसार, आज संसद
Jyotirao Phule President, VP PM LS Speaker Pay Floral Tributes at Prerna Sthal


नवी दिल्ली, 11 एप्रिल (हिं.स.)। महात्मा ज्योतिराव फुले यांच्या २०० व्या जयंतीनिमित्त राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान आणि लोकसभा अध्यक्षांनी प्रेरणा स्थळ येथे पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.

लोकसभा सचिवालयाने दिलेल्या माहितीनुसार, आज संसद भवन परिसरातील प्रेरणा स्थळ येथे महात्मा ज्योतिराव फुले यांच्या २०० व्या जयंतीनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिरला, राज्यसभा उपसभापती हरिवंश, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे.पी. नड्डा, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री वीरेंद्र कुमार, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, कायदा व न्याय आणि संसदीय कामकाज राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) अर्जुन राम मेघवाल, खासदार, माजी खासदार, लोकसभा महासचिव उत्पल कुमार सिंह आणि इतर मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहिली.

महात्मा ज्योतिराव फुले, जे महात्मा फुले या नावाने प्रसिद्ध आहेत, ते १९व्या शतकातील भारतातील एक प्रमुख समाजसुधारक होते. त्यांनी आपले जीवन सामाजिक आणि आर्थिक विषमता दूर करण्यासाठी समर्पित केले आणि गरीब, शेतकरी व समाजातील इतर वंचित घटकांच्या उन्नतीसाठी अथकपणे कार्य केले.

त्यांनी १८७३ मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली, ज्याचा उद्देश शोषण रोखणे आणि भेदभावपूर्ण वागणुकीमुळे पीडित असलेल्यांची मुक्ती करणे हा होता. ते कृषीचे महत्त्व, शेतकऱ्यांचे कल्याण आणि शेतकऱ्यांसाठी वैज्ञानिक शिक्षणावर भर देणाऱ्या सुरुवातीच्या विचारवंतांपैकी एक होते.

महात्मा ज्योतिराव फुले हे १८७६ ते १८८२ या काळात पुणे महानगरपालिकेचे सदस्य होते आणि १८८८ मध्ये गरीब व उपेक्षितांच्या मुक्तीसाठी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना 'महात्मा' आणि 'भारताचे बुकर टी. वॉशिंग्टन' या उपाधींनी सन्मानित करण्यात आले. संसद भवन संकुलात स्थापित, राम व्ही. सुतार यांनी साकारलेली आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते ३ डिसेंबर २००३ रोजी अनावरण झालेली महात्मा ज्योतिबा फुले यांची १२ फूट उंच कांस्य मूर्ती, सध्या संकुलातील प्रेरणा स्थळ येथे आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande