
कोलकाता, 11 एप्रिल (हिं.स.)पश्चिम बंगालमध्ये निवडणूक प्रचार जोरात सुरू असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी राज्याचा दौरा केला. सभेपूर्वी, पंतप्रधान मोदींनी त्यांच्या खास शैलीत सोशल मीडियावर एक इन्स्टाग्राम रील तयार केली, जी सर्वत्र चर्चेचा विषय बनली आहे.
पंतप्रधान मोदी म्हणाले, माझ्यामागे बंगालचा मूड कसा आहे, हे तुम्ही पाहू शकता. आता फक्त सकाळी ११-११:३० वाजले आहेत. आजची ही माझी पहिली सभा आहे आणि माझ्यामागे एवढे लोक जमले आहेत.
इन्स्टाग्राम रीलसोबतच्या कॅप्शनमध्ये पंतप्रधान मोदींनी लिहिले आहे की, दुपारची वेळ झाली आहे आणि प्रचंड उकाडा आहे, तरीही पश्चिम बंगालमधील जनतेचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. आपल्या संदेशात पंतप्रधान मोदींनी लिहिले, दुपारची वेळ झाली आहे. प्रचंड उकाडा आहे, पण पश्चिम बंगालचा उत्साह आणि जोश शिगेला पोहोचला आहे. संपूर्ण राज्यात कमळ आपल्यासोबत आहे.
व्हिडिओमध्ये पंतप्रधानांच्या मागे लोकांची मोठी गर्दी स्पष्टपणे दिसत आहे. ते म्हणाले की, नागरिक त्यांची आतुरतेने वाट पाहत होते आणि हेलिपॅडवरून थेट सभेच्या ठिकाणी जात होते. पंतप्रधान मोदींचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे