
पुणे, 11 एप्रिल (हिं.स.)। राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री करण्याचा धक्कादायक प्रकार घडला. यामुळे मंत्री छगन भुजबळ क्षणभर धोक्यात आले, मात्र सुदैवाने कोणतीही अपघात झाला नाही. पुण्यातील पुरंदर येथे हा गंभीर प्रकार घडला. खानवडीतील जिल्हा परिषद शाळेच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी भुजबळ हे नाशिकहून पुण्याच्या दिशेने येत असताना ही घटना घडली. हेलिकॉप्टरच्या पायलटने हेलिपॅडऐवजी शाळेजवळील पार्किंग क्षेत्रात हेलिकॉप्टर उतरवलं. कार्यक्रम स्थळी उपस्थित असलेल्या लोकांमध्ये या प्रकाराने मोठी खळबळ उडाली.सुदैवाने मंत्री सुरक्षित आहेत, पण पायलटच्या या गंभीर चुकेची चौकशी होण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांचे हेलिकॉप्टर पायलटने हेलिपॅड ऐवजी चक्क कार पार्किंगमधे उतरवण्याच्या प्रकार घडला आहे. या गंभीर प्रकारामुळे पोलिसांसह अधिकाऱ्यांची चांगलीच धावपळ पाहायला मिळाली. पुरंदर तालुक्यातील महात्मा फुलेंच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला भुजबळ पोहचत होते. त्यासाठी भुजबळांचे हेलिकॉप्टर खानवडी गावात पोहचले. हेलिकॉप्टर उतरण्यासाठी हेलिपॅड वेगळ्या ठिकाणी तयार करण्यात आले होते. मात्र कार पार्किंगमधील मोकळी जागा पाहून पायलटला इथेच हेलिपॅड असावं असं वाटलं आणि त्याने तिथे हेलिकॉप्टर उतरवले. त्यानंतर पोलिसांनी पायलटला याची कल्पना दिल्यानंतर ते हेलिकॉप्टर तिथून हलविण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु