आयुष शेट्टी बॅडमिंटन आशिया चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत
-आयुष शेट्टीची जागतिक क्रमवारीतील अव्वल बॅडमिंटनपटूवर मात-61 वर्षांचा बॅडमिंटन आशिया चॅम्पियनशिपमध्ये भारताचा सुवर्णपदाकाचा दुष्काळ संपणार ?-आयुष ऐतिहासिक विजेपदासापून एक पाऊल दूर बीजिंग, 11 एप्रिल (हिं.स.)भारताच्या आयुष शेट्टीने जागतिक क्रमवारीत
आयुष शेट्टी


-आयुष शेट्टीची जागतिक क्रमवारीतील अव्वल बॅडमिंटनपटूवर मात-61 वर्षांचा बॅडमिंटन आशिया चॅम्पियनशिपमध्ये भारताचा सुवर्णपदाकाचा दुष्काळ संपणार ?-आयुष ऐतिहासिक विजेपदासापून एक पाऊल दूर

बीजिंग, 11 एप्रिल (हिं.स.)भारताच्या आयुष शेट्टीने जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या कुनलावुत विटिडसर्नला पराभूत करत बॅडमिंटन आशिया चॅम्पियनशिप २०२६ च्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. हा त्याच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा विजय आहे. या २० वर्षीय भारतीय बॅडमिंटनपटूने शनिवारी निंगबो येथे एक गेम गमावल्यानंतर पुनरागमन करत १०-२१, २१-१९, २१-१७ असा संस्मरणीय विजय नोंदवला. या विजयासह, तो भारताची ६१ वर्षांची प्रतीक्षा संपवण्यापासून केवळ एक विजय दूर आहे. भारताने गेल्या ६१ वर्षांपासून एकेरीतील ही चॅम्पियनशिप जिंकलेली नाही. दिनेश खन्ना हे एकमेव भारतीय आहेत ज्यांनी हे विजेतेपद पटकावले आहे. त्यांनी १९६५ मध्ये या चॅम्पियनशिपमध्ये पुरुष एकेरी गटात सुवर्णपदक जिंकले होते.

पॅरिस २०२४ च्या रौप्यपदक विजेत्याचा सामना करताना, आयुष सुरुवातीला बॅकफूटवर होता आणि त्याने पहिला गेम सहज गमावला. मात्र, त्याने जोरदार पुनरागमन केले आणि हळूहळू सामना आपल्या बाजूने वळवला. त्याने विटिडसर्नच्या प्रत्येक गुणाला प्रत्युत्तर दिले आणि नंतर निर्णायक गेममध्ये सामन्यावर पूर्णपणे नियंत्रण मिळवले.

हा विजय भारतीय बॅडमिंटनसाठी एक ऐतिहासिक क्षण आहे. १९६५ मध्ये दिनेश खन्ना यांच्यानंतर या चॅम्पियनशिपच्या पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत पोहोचणारा शेट्टी हा केवळ दुसरा भारतीय ठरला आहे. उपांत्य फेरी गाठून त्याने आधीच एक पदक निश्चित केले होते, आणि २०१८ मध्ये एच. एस. प्रणॉय यांच्यानंतर एकेरीमध्ये असे करणारा तो पहिला भारतीय पुरुष बॅडमिंटनपटू ठरला आहे.

या स्पर्धेतील शेट्टीचा प्रवास चमत्कारापेक्षा कमी नाही. जागतिक क्रमवारीत २५ व्या क्रमांकावर असलेल्या शेट्टीने जागतिक क्रमवारीत ७ व्या क्रमांकावर असलेल्या ली शी फेंगवर दणदणीत विजय मिळवून आपल्या प्रवासाची सुरुवात केली. पुढच्या फेरीत त्याने चिन यू जेनला पराभूत केले. त्यानंतर उपांत्यपूर्व फेरीत त्याने जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर असलेल्या जोनाथन क्रिस्टीला पराभूत करत उपांत्य फेरी गाठली होती.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande