अहमदाबादमध्ये होणाऱ्या २०३० च्या राष्ट्रकुल खेळांमध्ये १७ खेळांचा समावेश होण्याची शक्यता
नवी दिल्ली, 11 एप्रिल (हिं.स.)राष्ट्रकुल क्रीडा अध्यक्ष डोनाल्ड रुकारे यांनी अहमदाबाद येथे होणाऱ्या २०३० च्या राष्ट्रकुल खेळांच्या तयारीवर समाधान व्यक्त केले. त्यांनी सांगितले की, या खेळांमध्ये १७ खेळांचा समावेश अपेक्षित आहे. हा एक छोटा पण सांस्कृत
कॉमनवेल्थ गेम्स स्टेडियम संग्रहित फोटो


नवी दिल्ली, 11 एप्रिल (हिं.स.)राष्ट्रकुल क्रीडा अध्यक्ष डोनाल्ड रुकारे यांनी अहमदाबाद येथे होणाऱ्या २०३० च्या राष्ट्रकुल खेळांच्या तयारीवर समाधान व्यक्त केले. त्यांनी सांगितले की, या खेळांमध्ये १७ खेळांचा समावेश अपेक्षित आहे. हा एक छोटा पण सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण कार्यक्रम असून, जागतिक आकर्षण आणि स्थानिक भावना यांच्यात संतुलन साधण्याचे उद्दिष्ट आहे. दिल्लीत बोलताना रुकारे म्हणाले की, खेळांची अंतिम यादी २०२७ च्या मध्यापर्यंत निश्चित केली जाईल.

२०३० च्या राष्ट्रकुल खेळांचा संपूर्ण कार्यक्रम त्यावेळी जाहीर केला जाईल. ते म्हणाले, आम्ही लवकरच अंदाजे १६ ते १७ खेळांचा संपूर्ण कार्यक्रम जाहीर करण्याची आशा करतो. २०२७ च्या मध्यापर्यंत, आम्ही तुम्हाला खेळांविषयी आणि आमच्या शुभारंभाविषयी निश्चित उत्तर देऊ शकू. प्रस्तावित यादीचे एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे २०२२ च्या बर्मिंगहॅम खेळांमधून वगळण्यात आलेल्या खेळांचा समावेश असेल, कारण भारतीय प्रेक्षकांसाठी त्यांचे भावनिक महत्त्व आहे.

भारतीय आयोजक अहमदाबादमध्ये त्या सर्व खेळांचा समावेश करण्याचा प्रयत्न करत आहेत, जे बर्मिंगहॅम २०२२ मधून वगळण्यात आले होते आणि दोन महिन्यांनंतर होणाऱ्या ग्लासगो राष्ट्रकुल खेळांमध्येही त्यांचा समावेश नसेल. बर्मिंगहॅममधून नेमबाजी आणि तिरंदाजी हे खेळ वगळण्यात आले होते. बॅडमिंटन, क्रिकेट, हॉकी, नेमबाजी, स्क्वॅश, टेबल टेनिस आणि कुस्ती यांसह नऊ प्रमुख खेळ या वर्षी ग्लासगोमध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल खेळांमधून वगळण्यात आले आहेत.

रुकारो म्हणाले, आम्ही जे पाहिले आहे, त्यावरून हे स्पष्ट आहे की भारतामध्ये विविध प्रकारच्या खेळांचे आयोजन करण्याची क्षमता आहे. यात काही शंका नाही की भारतीय ऑलिम्पिक संघटना, आंतरराष्ट्रीय क्रीडा महासंघ आणि यजमान देशासोबत सर्व आवश्यक चर्चा पूर्ण केल्यानंतर, एक असा भव्य आणि प्रभावी कार्यक्रम तयार केला जाईल जो प्रत्येकाच्या गरजा पूर्ण करेल. हे लक्षात घेण्यासारखे आहे की २०३० च्या राष्ट्रकुल खेळांमध्ये टी२० फॉरमॅटमधील पुरुष आणि महिला क्रिकेट आणि हॉकीचा समावेश केला जाऊ शकतो.

हे तीन खेळ विचाराधीन असलेल्या मुख्य सांघिक खेळांपैकी आहेत, ज्यांची लोकप्रियता आणि व्यावसायिक क्षमता प्रचंड आहे. पारंपरिक खेळांच्या प्रकारात योगाचाही पदक स्पर्धा म्हणून समावेश केला जात आहे. रुकारे यांनी, सीईओ केटी सॅडलियर आणि गेम्स अँड अश्युरन्सचे संचालक डॅरेन हॉल यांच्यासह, ८ आणि ९ तारखेला अहमदाबाद, गांधीनगर, वडोदरा आणि एकता नगर येथील पायाभूत सुविधा आणि क्रीडास्थळांची पाहणी केली. त्यानंतर हे तिघे शुक्रवारी दिल्लीत दाखल झाले. राष्ट्रकुल क्रीडा शिष्टमंडळाने खेळांच्या तयारीबद्दल समाधान व्यक्त केले.

राष्ट्रकुल क्रीडा चळवळीसमोरील व्यापक आव्हाने रुकारे यांनी मान्य केली. वाढता खर्च आणि घटत्या सार्वजनिक आवडीमुळे अलीकडील यजमान शहरांना त्यांच्या स्पर्धांचा आकार कमी करण्यास आणि क्रीडास्थळांची संख्या मर्यादित करण्यास भाग पडले आहे. या दबावांमुळे खेळांच्या दीर्घकालीन प्रासंगिकता आणि शाश्वततेबद्दल चिंता वाढली आहे. त्यांनी सांगितले की, खेळाडू आणि सदस्य देश अजूनही राष्ट्रकुल खेळांना एक महत्त्वपूर्ण क्रीडा स्पर्धा मानतात, पण सहभाग आणि आवडीमध्ये काही प्रमाणात चढ-उतार झाला आहे. खेळ प्रासंगिक, उत्तरदायी आणि पसंतीचा पर्याय राहतील याची खात्री करणे हे आमचे ध्येय आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande