
छत्रपती संभाजीनगर, 15 एप्रिल, (हिं.स.) - विकासकामांचा उद्घाटन सोहळा कन्नड येथे आमदार संजय दादा यांच्या हस्ते संपन्न झाला. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य एकनाथ शिंदे यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर कन्नड नगरपालिकेच्या प्रभाग क्र. २ मधील सुमारे १ कोटी ३० लाख रुपयांच्या विविध विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले. या विकासकामांमुळे शहराच्या पायाभूत सुविधांना चालना मिळणार असून नागरिकांना अधिक चांगल्या आणि दर्जेदार सुविधा उपलब्ध होणार आहेत.
शहराचा सर्वांगीण आणि वेगवान विकास साधण्यासाठी शासनाच्या माध्यमातून लोकाभिमुख निर्णय सातत्याने घेतले जात आहेत. यावेळी नागरिकांचे जीवनमान उंचावणे आणि कन्नड शहराला प्रगतीच्या दिशेने नेण्याचा ठाम निर्धार असल्याची बाब नमूद केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis