राज्यातील शाळांच्या स्वयंमूल्यांकनाला १ मे पर्यंत मुदतवाढ
पुणे, 17 एप्रिल (हिं.स.)। शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखड्याअंतर्गत (स्क्वॉफ) शैक्षणिक वर्ष २०२५-२६साठी शाळांच्या स्वयंमूल्यांकनासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. आता शाळांना १ मेपर्यंत स्वयंमूल्यांकनाची प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे. स्वय
school


पुणे, 17 एप्रिल (हिं.स.)। शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखड्याअंतर्गत (स्क्वॉफ) शैक्षणिक वर्ष २०२५-२६साठी शाळांच्या स्वयंमूल्यांकनासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. आता शाळांना १ मेपर्यंत स्वयंमूल्यांकनाची प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे.

स्वयंमूल्यांकनाच्या १६ एप्रिलपर्यंतच्या आकडेवारीनुसार राज्यातील १ लाख ०८ हजार ९२ शाळांपैकी ५६ हजार ११० शाळांनी मूल्यांकन पूर्ण केले आहे, तर ५१ हजार ९८२ शाळांनी अद्याप मूल्यांकन पूर्ण केलेले नाही.

राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या सहसंचालक डॉ. कमलादेवी आवटे यांनी शाळांच्या स्वयंमूल्यांकनाला मुदतवाढ देण्यात आल्याचे परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. राज्यातील सर्व शाळांचे मूल्यांकन करण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद येथे शाळा मानक प्राधिकरण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या अंतर्गत राज्यातील सर्व माध्यमाच्या, सर्व व्यवस्थापनाच्या शाळांंसाठी शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखड्याची निर्मिती करण्यात आली आहे. शैक्षणिक वर्ष २०२४-२५मधील शाळांचे स्वयंमूल्यांकन पूर्ण करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande