इराणचा सुपरटँकरने अमेरिकेला चकवा देत होर्मुज जलडमरूमध्य केला पार
तेहरान, 15 एप्रिल (हिं.स.)।होर्मुज जलडमरूमध्यात डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलेल्या नाकेबंदीच्या पार्श्वभूमीवर इराणने मोठा दावा केला आहे. बुधवारी भारतातील इराणी दूतावासाने सांगितले की, अमेरिकेकडून ब्लॅकलिस्ट करण्यात आलेल्या त्यांच्या एका सुपरटँकरने
इराणचा सुपरटँकरने अमेरिकेला चकवा देत होर्मुज जलडमरूमध्य केला पार


तेहरान, 15 एप्रिल (हिं.स.)।होर्मुज जलडमरूमध्यात डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलेल्या नाकेबंदीच्या पार्श्वभूमीवर इराणने मोठा दावा केला आहे. बुधवारी भारतातील इराणी दूतावासाने सांगितले की, अमेरिकेकडून ब्लॅकलिस्ट करण्यात आलेल्या त्यांच्या एका सुपरटँकरने ट्रॅकर सुरू ठेवत आंतरराष्ट्रीय जलक्षेत्र आणि होर्मुज जलडमरूमध्य यशस्वीरीत्या पार केला आहे. हा सुपरटँकर कोणत्याही नुकसानीशिवाय सुरक्षितपणे इराणच्या किनाऱ्यांवर पोहोचला आहे.

मुंबईतील इराणच्या महावाणिज्य दूतावासाने ‘एक्स’वर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, अमेरिकेकडून ब्लॅकलिस्ट केलेला एक अतिशय मोठा क्रूड कॅरिअर (VLCC) अमेरिकन नाकेबंदीला न जुमानता होर्मुज जलडमरूमध्य पार करून इराणच्या किनाऱ्यांपर्यंत पोहोचला. पोस्टमध्ये असेही नमूद करण्यात आले की, हा इराणी सुपरटँकर पूर्ण प्रवासादरम्यान आपला ट्रॅकिंग सिस्टम सुरू ठेवून उघडपणे पुढे सरकत राहिला आणि कोणताही लपवाछपवी न करता आंतरराष्ट्रीय जलक्षेत्र पार केले.

इराणी दूतावासाने सांगितले की, सुमारे २० लाख बॅरलपर्यंत कच्चे तेल वाहून नेण्याची क्षमता असलेल्या या सुपरटँकरने संपूर्ण प्रवासात आपला ट्रॅकिंग सिस्टम सुरू ठेवून अमेरिकेच्या नाकेबंदीला थेट आव्हान दिले आणि कोणत्याही अडथळ्याशिवाय आपल्या गंतव्यस्थानी पोहोचला.

यापूर्वी अमेरिकेने जाहीर केले होते की, होर्मुज जलडमरूमध्यात अशी नाकेबंदी लागू करण्यात आली आहे, ज्याअंतर्गत इराणच्या बंदरांतून येणाऱ्या कोणत्याही जहाजांना थांबवले जाईल. तसेच, इराणला कोणत्याही प्रकारचा शुल्क (टोल) भरलेल्या जहाजांनाही रोखले जाईल. अमेरिकेने असेही म्हटले आहे की, इराणच्या अर्थव्यवस्थेतील सुमारे ९० टक्के हिस्सा हा समुद्रामार्गे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय व्यापारावर अवलंबून आहे. नाकेबंदी लागू झाल्यानंतर अवघ्या ३६ तासांच्या आत, अमेरिकन सैन्याने समुद्रमार्गे इराणकडे होणारा ये-जा आर्थिक व्यापार पूर्णपणे ठप्प केल्याचा दावा केला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande