इंडोनेशियाच्या बोर्नियो बेटावर हेलिकॉप्टर कोसळून अपघात, आठ जणांचा मृत्यू
जकार्ता , 17 एप्रिल (हिं.स.)।इंडोनेशियाच्या बोर्निओ बेटावर दोन पाम ऑइल प्लांटेशन दरम्यान उड्डाण करणारे हेलिकॉप्टर कोसळल्याने मोठा अपघात घडला आहे. या अपघातात सर्व आठ जणांचा मृत्यू झाला आहे. ही माहिती इंडोनेशियाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी दिली. एअरब
इंडोनेशियाच्या बोर्नियो बेटावर हेलिकॉप्टर कोसळून अपघात, आठ जणांचा मृत्यू


जकार्ता , 17 एप्रिल (हिं.स.)।इंडोनेशियाच्या बोर्निओ बेटावर दोन पाम ऑइल प्लांटेशन दरम्यान उड्डाण करणारे हेलिकॉप्टर कोसळल्याने मोठा अपघात घडला आहे. या अपघातात सर्व आठ जणांचा मृत्यू झाला आहे. ही माहिती इंडोनेशियाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी दिली.

एअरबस H130 मॉडेलचे हे हेलिकॉप्टर पीटी मॅथ्यू एअर नुसंतारा कंपनीचे होते. या हेलिकॉप्टरने गुरुवारी वेस्ट कालिमंतान प्रांतातील मेलावी जिल्ह्यातून उड्डाण केले होते. उड्डाणानंतर अवघ्या पाच मिनिटांतच त्याचा संपर्क तुटला. हे हेलिकॉप्टर कुबू राया जिल्ह्यातील दुसऱ्या पाम ऑइल प्लांटेशनकडे जात होते.

राष्ट्रीय शोध व बचाव संस्था आणि परिवहन मंत्रालयाच्या माहितीनुसार, शोध पथकांनी नंतर सेकाडाऊ जिल्ह्यातील दाट जंगलात हेलिकॉप्टरचा अवशेष शोधून काढला. त्यानंतर दोन कर्मचाऱ्यांसह सहा प्रवाशांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. मृतांमध्ये एका मलेशियन नागरिकाचाही समावेश आहे.

सुमारे 27 कोटी लोकसंख्या असलेला इंडोनेशिया हा विशाल द्वीपसमूह देश असून, येथे वाहतूक अपघातांची समस्या कायम आहे. विमान, हेलिकॉप्टर दुर्घटना तसेच फेरीबोट बुडण्याच्या घटना येथे वारंवार घडत असतात.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande