छ. संभाजीनगर - जिल्हा परिषदेच्या १० विषय समित्यांवर ८३ सदस्यांची बिनविरोध निवड
छत्रपती संभाजीनगर, 16 एप्रिल (हिं.स.)विविध राजकीय पक्षांमधील सल्लामसलत, मनधरणी आणि तडजोडींच्या मालिकेनंतर जिल्हा परिषदेच्या १० विषय समित्यांवर ८३ सदस्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मराठवाडा महसूल प्रशिक्षण प्रबोधिनीच्या सभागृहात जिल्हा परिषद अध्
छ. संभाजीनगर - जिल्हा परिषदेच्या १० विषय समित्यांवर ८३ सदस्यांची बिनविरोध निवड


छत्रपती संभाजीनगर, 16 एप्रिल (हिं.स.)विविध राजकीय पक्षांमधील सल्लामसलत, मनधरणी आणि तडजोडींच्या मालिकेनंतर जिल्हा परिषदेच्या १० विषय समित्यांवर ८३ सदस्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

मराठवाडा महसूल प्रशिक्षण प्रबोधिनीच्या सभागृहात जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश गलांडे यांच्या उपस्थितीत निवड प्रक्रिया पार पडली. स्थायी, वित्त (अर्थ), बांधकाम (कामे), कृषी, शिक्षण, आरोग्य, जल व्यवस्थापन व पाणीपुरवठा, पशुसंवर्धन व दुग्धविकास तसेच समाजकल्याण अशा प्रमुख समित्यांसाठी नामनिर्देशन अर्ज दाखल करणे, स्वीकृती आणि माघारीची प्रक्रिया राबविण्यात आली. मात्र, अपेक्षेपेक्षा जास्त म्हणजेच १०० हून अधिक अर्ज दाखल झाल्याने निवड प्रक्रिया गुंतागुंतीची ठरली. सत्ताधारी भाजपने शिवसेना, शिवसेना यूबीटी, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यासोबत पूर्वनियोजन करून जागावाटपाचा फॉर्म्युला तयार केला होता.

शिवसेना युबीटीतील अंतर्गत मतभेदामुळे परिस्थिती अधिक गुंतागुंतीची झाली. कृष्णा पाटील डोणगावकर यांची जलसंधारण समितीसाठी शिफारस करण्यात आली होती. तर, मनोज गायके यांना स्थायी समितीसाठी प्राधान्य देण्यात आले होते. मात्र, ऐनवेळी डोणगावकर यांनी स्थायी समितीत स्थान मिळावे, अशी भूमिका घेतली. सर्वपक्षीय नेत्यांनी हस्तक्षेप करत संबंधित सदस्यांची समजूत काढली. अनेक बैठका, चर्चासत्रे आणि तडजोडींच्या माध्यमातून अखेर सर्वांना मान्य होईल, असा तोडगा काढण्यात आला.

या सूत्रानुसार सर्व समित्या बिनविरोध करण्याचा प्रयत्न झाला. पण, अनेक सदस्यांनी आपल्या पसंतीच्या समित्यांवर आग्रह धरत बदलाची मागणी केल्याने समीकरणे बिघडली. जिल्हा परिषदेत या समित्यांवर आपलीच वर्णी लागावी, यासाठी अनेकांनी फिल्डींग लावली होती.

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande