
लातूर, 16 एप्रिल (हिं.स.)।
लातूरच्या नामांकीत इंग्रजी शाळेतील कर्मचाऱ्याने चक्क धाब्यावर बसून मद्यपान करत विद्यार्थ्यांचे पेपर तपासलेचा धक्कादायक प्रकार लातूर मधून समोर येत आहे. चक्क शाळेतल्या कर्मचाऱ्याने विद्यार्थ्याचे पेपर धाब्यावर बसून मित्रा सोबत मद्यपान करून पेपर तपासत असलेला व्हिडिओ सध्या लातूरमध्ये चर्चेत आला आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शाळेने मद्यपान करत असलेल्या शिक्षकाला शाळेतून काढून टाकल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. मात्र धाब्यावर बसून पेपर तपासणाऱ्या कर्मचाऱ्यावर प्रशासन कडक कारवाई करेल का.
याकडे विद्यार्थ्यांच्या पालकांचे व लातुरकरांचे लक्ष लागले आहे . हा सर्व प्रकार बघून कष्ट करून लाखो रुपये खर्च करून मुलांना शिक्षणासाठी पाठवणाऱ्या पालकांच्या अपेक्षा भंग झाल्या आहेत.
या संपूर्ण प्रकरणाला जबाबदार नेमकं कोण असाही प्रश्नचिन्ह या ठिकाणी निर्माण केला जात आहे. सध्या लातूरमध्येच नव्हतं पूर्ण महाराष्ट्रामध्ये हा व्हिडिओ चर्चेचा विषय ठरला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis