
छत्रपती संभाजीनगर, 16 एप्रिल, (हिं.स.)। स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त जिल्ह्यातील १२६ केंद्रांवर सप्ताह पार पडला. यात ७६ हजार सेवेकऱ्यांनी सामुदायिक गुरुचरित्र वाचनात सहभाग घेतला.
स्वामी पुण्यतिथीला त्या सेवेचा हिशोब स्वामी चरणावर अर्पण केला जातो. यात प्रामुख्याने सामुदायिक स्वामी चरित्र पारायण दुर्गा सप्तशती, नवनाथ, भागवत, विष्णुसहस्रनाम, रुद्र इत्यादी ग्रंथांचे सामुदायिक वाचन तसेच सामुदायिक श्री स्वामी समर्थ जप, महामृत्युंजय, गायत्री, नवार्णव इत्यादी मंत्रांचा सामुदायिक जप करण्यात आला. त्यानंतर सर्व सेवेकऱ्यांनी स्वामींना नैवेद्य दाखवून आरती केली. त्यानंतर २४ ते २७एप्रिलला होणारा संस्कार महोत्सव, मूल्य संस्कार एक्स्पो या उपक्रमाची माहिती देण्यात आली. २५ एप्रिलला रोजगार मेळावा व महिलांसाठी बचत गट प्रशिक्षण याची माहिती दिली. त्यानंतर महाप्रसादाने सप्ताहाची सांगता झाली.
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis