
नांदेड, 16 एप्रिल, (हिं.स.)। नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या अग्निशमन व आपत्कालीन सेवा विभागाच्या वतीने शहरातील मुख्य अग्निशमन कार्यालयात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी महापौर कविता संतोष मुळे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. मंचावर उपमहापौर दिपकसिंग रावत, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, स्थायी समिती सभापती विरेंद्रसिंग गाडीवाले, गटनेते सय्यद मुजीब सय्यद मुख्तार, गटनेते साबेर चाऊस नासेर चाऊस, उपायुक्त अजितपालसिंग संधू, उपआयुक्त अभिजित वायकोस, अग्निशमन अधिकारी केरोजी दासरे, क्षेत्रिय मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनीही जवानांच्या कामगिरीचा गौरव केला.
विशेष म्हणजे, कंत्राटी स्वरूपात काम करणाऱ्या जवानांना कामादरम्यान अपघात झाल्यास शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच १ कोटी रुपयांचे विमा कवच मिळावे, यासाठी प्रशासन प्रयत्नशील असून त्यांना हा लाभ मिळवून दिला जाईल, असे महत्त्वाचे आश्वासन आयुक्तांनी यावेळी दिले. कार्यक्रमाच्या समारोपास अग्निशमन अधिकारी केरोजी दासरे यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे आणि कर्मचाऱ्यांचे आभार मानले. या कार्यक्रमास अग्निशमन विभागाचे सर्व जवान व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अधिकारी रावण सोनसळे, जनसंपर्क अधिकारी सुमेध बनसोडे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना उपअग्निशमन अधिकारी निलेश कांबळे यांनी विभागाच्या कार्यपद्धतीची सविस्तर माहिती विशद केली. त्यांनी सांगितले की, मागील वर्षभरात विभागाने सुमारे २०० आगीच्या घटनांवर यशस्वीरीत्या नियंत्रण मिळवले आहे. तसेच त्यांनी विभागाकडील अत्याधुनिक यंत्रसामग्री आणि कर्मचाऱ्यांच्या संख्येसह कामात येणाऱ्या अडचणींचाही माहिती दिली.
अध्यक्षीय भाषणात महापौर कविता मुळे यांनी जवानांच्या साहसाचे कौतुक केले. त्या म्हणाल्या, आग लागल्यावर सर्वजण दूर पळतात, पण अग्निशमन जवान आपला जीव धोक्यात घालून इतरांचे प्राण वाचवण्यासाठी आगीत शिरतात. त्यांचे कार्य अत्यंत कौतुकास्पद आहे. माजी मुख्यमंत्री खा. अशोकरावजी चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली विभागाला अत्याधुनिक साहित्य आणि उच्च दर्जाचे प्रॉक्झिमिटी सूट लवकरच उपलब्ध करून दिले जातील. तुम्ही नागरिकांची काळजी घ्या, आम्ही तुमची काळजी घेऊ.
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis