कोल्हापूर, सांगलीत महावितरणकडून आर्थिक वर्षात 64 हजार 260 नवीन वीजजोडण्या
कोल्हापूर, 16 एप्रिल (हिं.स.)। महावितरणने कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात मागील आर्थिक वर्षात (एप्रिल 2025 ते मार्च 2026) 64 हजार 260 नवीन वीजजोडण्या दिलेल्या आहेत. त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यात 36 हजार 775 तर सांगली जिल्ह्यात 27 हजार 485 ग्राहकांना न
कोल्हापूर, सांगलीत महावितरणकडून आर्थिक वर्षात 64 हजार 260 नवीन वीजजोडण्या


कोल्हापूर, 16 एप्रिल (हिं.स.)। महावितरणने कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात मागील आर्थिक वर्षात (एप्रिल 2025 ते मार्च 2026) 64 हजार 260 नवीन वीजजोडण्या दिलेल्या आहेत. त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यात 36 हजार 775 तर सांगली जिल्ह्यात 27 हजार 485 ग्राहकांना नवीन वीजजोडण्या देण्यात आल्या आहेत. नव्याने समाविष्ठ झालेल्या ग्राहकांचा विचार करता मार्च 2026 अखेर कोल्हापूर जिल्ह्याची एकूण वीज ग्राहक संख्या 12 लाख 84 हजार 800 तर सांगली जिल्ह्याची वीज ग्राहक संख्या 10 लाख 5 हजार 13 इतकी झाली आहे.

नवीन सेवा जोडणी योजनेतून (एनएससी) अकृषक वर्गवारीतील ग्राहकांना नवीन वीजजोडणीसाठी पायाभूत सुविधांची उभारणी करण्याची आवश्यकता असल्यास ती महावितरणकडून करण्यात येत आहे. त्यासाठी ग्राहकास कोणताही खर्च करावा लागणार नाही. नवीन ग्राहकांना केवळ सेवा जोडणी शुल्क व सुरक्षा ठेव रक्कम भरावी लागेल. याकरिता महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने निर्धारीत केलेल्या कृती मानकांनुसार कालमर्यादेचे पालन महावितरणकडून केले जात आहे. शहरी भागात 7 दिवस आणि ग्रामीण भागात 15 दिवसांत वीज जोडणी देण्यात येत आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात घरगुती वर्गवारीत 26 हजार 366 वीजजोडण्या, व्यावसायिक वर्गवारीत 7 हजार 361, औद्योगिक वर्गवारीत 1 हजार 729, सार्वजनिक सेवा वर्गवारीत 283, सार्वजिक पाणीपुरवठा वर्गवारीत 140, दिवाबत्ती वर्गवारीत 858 व इतर वर्गवारीत 858 अशा एकूण 36 हजार 775 वीजजोडण्यांचा समावेश आहे. तर सांगली जिल्ह्यात घरगुती वर्गवारीत 20 हजार 451, व्यावसायिक वर्गवारीत 4 हजार 970, औद्योगिक वर्गवारीत 623, सार्वजिक सेवा वर्गवारीत 574, सार्वजनिक पाणीपुरवठा वर्गवारीत 46, दिवाबत्ती वर्गवारीत 32 तर इतर 789 एकूण 27 हजार 485 वीजजोडण्यांचा समावेश आहे.

अर्जदाराला वीज पुरवठा करणे, हे महावितरणचे कर्तव्य आहे. अर्जदाराने परिपूर्ण अर्ज व आवश्यक शुल्क भरल्यानंतर वीजपुरवठा केला जातो. अर्ज करणे, छाननी करणे, वीज जोडणीचा आदेश देण्यापर्यंतची प्रक्रिया ऑनलाईन आहे. अर्जदाराला वीजपुरवठा देण्यासाठी सध्याच्या विद्युत वाहिन्यांचा विस्तार करणे, नवीन विद्युत वाहिनी उभारणी किंवा विद्युत यंत्रणेची क्षमतावृध्दी करणे इ. आवश्यक पायाभूत सुविधा उभारणीची कामे गरजेनुसार केली जातात. महावितरणव्दारे पायाभूत सुविधा उभारणी करून ग्राहक वीजसेवेपासून वंचित राहू नयेत, या हेतूने अकृषक ग्राहकांना नवीन वीजजोडणी देण्यासाठी महावितरणने क्षेत्रिय कार्यालयांना निर्देश दिले आहेत. ‘महावितरणच्या सर्वच सेवा आता ऑनलाईन उपलब्ध झाल्या असून ग्राहकांना कार्यालयात येण्याची गरज नाही. वीज नियामक आयोग व वरिष्ठ कार्यालय यांच्याकडून वेळेवेळी ठरवून देण्यात आलेल्या कृती मानकांनुसार ग्राहकांना सेवा देण्यास आम्ही कटीबद्ध आहोत,’ असे मत कोल्हापूर परिमंडलाचे मुख्य अभियंता स्वप्निल काटकर यांनी व्यक्त केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande