नाशिक - रणरागिणी जनआक्रोश बाईक रॅलीत आक्रमक मागण्या
आरोपींवर कठोर कारवाईची मागणी नाशिक, 16 एप्रिल, (हिं.स.)। नाशिकमध्ये घडलेल्या कथित धर्मांतर व अत्याचार प्रकरणाच्या निषेधार्थ गुरुवारी (दि. १६) ‘रणरागिणी जनआक्रोश बाईक’ रॅली काढण्यात आली. सखल हिंदू समाजाच्या वतीने आयोजित या रॅलीत मोठ्या संख्येने तरु
Aggressive demands in the


Aggressive demands in the


आरोपींवर कठोर कारवाईची मागणी

नाशिक, 16 एप्रिल, (हिं.स.)। नाशिकमध्ये घडलेल्या कथित धर्मांतर व अत्याचार प्रकरणाच्या निषेधार्थ गुरुवारी (दि. १६) ‘रणरागिणी जनआक्रोश बाईक’ रॅली काढण्यात आली. सखल हिंदू समाजाच्या वतीने आयोजित या रॅलीत मोठ्या संख्येने तरुणी, महिला आणि विविध संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. संबंधित प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

आमदार देवयानी फरांदे, महामंडलेश्वर किन्नर आखाड्याच्या शुभांगी शिंदे आणि हर्षा ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली सकाळी ११ वाजता जॉगिंग ट्रॅक येथून रॅलीला सुरुवात झाली. इंदिरानगर मार्गे मार्गक्रमण करत ही रॅली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोहोचली. रॅलीदरम्यान “वंदे मातरम”, “भारत माता की जय” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

रॅलीत कथित ‘कॉर्पोरेट जिहाद’ प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. तसेच शहरातील काही आयटी कंपन्यांची चौकशी करून प्रकरणाचा सखोल तपास करावा, असेही सांगण्यात आले. आरोपींवर गंभीर गुन्हे दाखल करून त्यांच्यावर जलदगती न्यायालयात खटला चालवावा आणि दोषींना कठोर शिक्षा व्हावी, अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली.

याचवेळी काही वक्त्यांनी आरोपींचे वकीलपत्र वकीलांनी घेऊ नये, असे आवाहन केले. या भूमिकेमुळे कायदेशीर प्रक्रियेबाबत चर्चेला उधाण आले आहे. दरम्यान, या प्रकरणातील पीडित तरुणींना न्याय मिळवून देण्यासाठी सुमारे २०० महिला वकील पुढे आल्या असून न्यायालयात त्यांची बाजू भक्कमपणे मांडण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.

या प्रकरणात काही व्यक्तींवर महिला कर्मचाऱ्यांचा लैंगिक छळ व धर्मांतरासाठी दबाव आणल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून, संबंधित संशयितांना शोधून तात्काळ अटक करावी, अशी मागणीही करण्यात आली. पोलिस प्रशासनाने निष्पक्ष आणि सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

या घटनेच्या पार्श्वभूमीवर शहरातील महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून, सुरक्षित वातावरणासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी विविध स्तरांतून होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande