डाॅ. आंबेडकर आणि श्री बसवेश्वर जयंती मिरवणुकांत डॉल्बी-डीजे वापरण्यावर बंदी
सोलापूर, 16 एप्रिल (हिं.स.)। डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवानिमित्त रविवारी मिरवणुका काढण्यात येणार आहेत. २० एप्रिल रोजी बसवेश्वर जयंती असून त्यानिमित्त देखील मिरवणुका निघणार आहेत. या पार्श्वभूमीवर डीजे सिस्टिमचा मोठ्या आवाजात वापर होण्याची शक्
डाॅ. आंबेडकर आणि श्री बसवेश्वर जयंती मिरवणुकांत डॉल्बी-डीजे वापरण्यावर बंदी


सोलापूर, 16 एप्रिल (हिं.स.)।

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवानिमित्त रविवारी मिरवणुका काढण्यात येणार आहेत. २० एप्रिल रोजी बसवेश्वर जयंती असून त्यानिमित्त देखील मिरवणुका निघणार आहेत. या पार्श्वभूमीवर डीजे सिस्टिमचा मोठ्या आवाजात वापर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनाने १७ एप्रिल ते २१ एप्रिल रोजी रात्री बारापर्यंत या कालावधीत आयोजित मिरवणुका, सार्वजनिक कार्यक्रमात आणि कोणत्याही व्यक्ती अथवा आयोजकांच्या कार्यक्रमात डॉल्बी- डीजे सिस्टिमचा वापर करण्यावर प्रतिबंध घालण्याचा निर्णय घेतला आहे. मोठ्या आवाजामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊन कानाचे विकार, छातीचा त्रास आणि इतरही शारीरिक समस्या उद्भवू शकतात, असे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे. यापूर्वीही सोलापूर शहरात निघालेल्या मिरवणुकांमध्ये डॉल्बी सिस्टिममुळे त्रास व अपघाताच्या घटना घडल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

सार्वजनिक आरोग्य व कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी ही बंदी आवश्यक असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. या आदेशानुसार, कोणत्याही मिरवणुकीत किंवा सार्वजनिक कार्यक्रमात डिजे (साऊंड) सिस्टिमचा वापर करता येणार नाही. आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर भारतीय न्याय संहिता २०२३ च्या १६३ (१) कलमानुसार कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिस आयुक्तांनी दिला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande