
बीड, 16 एप्रिल (हिं.स.)।
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती मिरवणुकीत कर्णकर्कशपणे डीजे वाजवून नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी संभाजीनगर ठाणे हद्दीत १२ डीजेचालक आणि १२ कार्यकर्ते तर परळी शहर पोलिस ठाण्यात दोन डिजेचालक व दोन कार्यकर्ते अशा एकुण २८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर दुसरीकडे गेवराईत एका डीजेचालकासह मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परळीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मिरवणुकीदरम्यान डीजेचा कर्णकर्कश दणदणाट केल्याप्रकरणी येथील संभाजीनगर पोलिसांनी १२ डीजेचालक व १२ कार्यकर्ते असे एकुण २४ तर शहर पोलिस ठाण्यात दोन डिजेचालक व दोन कार्यकर्ते असे चार जण एकुण २८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक अनिल शिंदे, पोलिस उपनिरीक्षक संदीप चव्हाण, एएसआय राजाभाऊ थळकरी, नानासाहेब धुमाळ, बालासाहेब चव्हाण यांनी ही कारवाई केली आहे. गेवराई शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीमध्ये या वाहनामध्ये कर्कश आवाजात डी. जे. वाजविल्याप्रकरणी पोलिस हवालदार रामराव आघाव यांच्या तक्रारीवरून डीजे वाहनमालक व वाहनचालक अशा दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेवराई ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis